विचार

संकटांपासून बचाव करणेच आवश्यक नाही

चाणक्य विचार: संकटांपासून स्वतःचा बचाव करणेच आवश्यक नाही. समजूतदार तो आहे जो संकटाशी दोन हात करेल व संकटाला समूळ संपवूनच थांबेल! ~ चाणक्य

नोंद

संघर्ष

संघर्ष हा जीवनाचा भाग आहे! अगदी इतका की प्रत्येक सेकंदाला आपण श्वास घेतांना देखील जीवन दोलायमान असते. मग कशासाठी संघर्षांला घाबरायचे? प्रत्येक जीव आपल्या जीवनात आपल्या क्षमतेनुसार संघर्षच करीत असतो. जन्मल्यापासून ते मरेपर्यंत तो चालतो.

विचार

विजय तुमचाच असेल! ~ महात्मा गांधी

महात्मा गांधी विचार: आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल! ~ महात्मा गांधी

विचार

चांगले कर्म चांगलेच फळ देतात! ~ चाणक्य

चाणक्य विचार : कधी कुणा दुसऱ्या व्यक्तीसमोर चांगला बनण्याचा प्रयत्न करू नका! आपण एकटे आलो आहोत! जाणार सुद्धा एकटेच! जसे कर्म करू तसे फळ मिळेल! जे घडून गेलं त्याला विसरून जा! जे करत आहेत त्यावर विश्वास ठेवा! जे होईल त्याची चिंता सोडून द्या! बस तुम्हाला फक्त कर्म करायचे आहे! त्याला पुरस्कार देण्याचे कार्य भाग्याचे आहे!… Read More चांगले कर्म चांगलेच फळ देतात! ~ चाणक्य

नोंद

कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे यांच्याबद्दल व त्यांचे कार्य आदर्शवतच! सोलापूर, पंढरपूर, नवी मुंबई, पुणे आणि आता नाशिक! त्यांच्याविरोधात केवळ कंत्राटातून आपली चैन भागवणारेच जाऊ शकतात. त्यांचे कार्य म्हणजे कायद्याचे पुस्तक! सगळीकडे हेच झाले. सोलापुरात दरवर्षी सिद्धेश्वर यात्रेची जागा म्हणजे मोकळं मैदान! धुळीचे लोट उठायचे! श्वसनाचे त्रास मोठ्याप्रमाणात व्हायचा! आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मॅट टाकण्याचा आदेश दिला. अन अनेकांच्या नाजूक… Read More कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे

गोष्ट, नोंद, मी

बोलणे आणि करणे

आपण बऱ्याच गोष्टी बोलत असतो. बऱ्याच कल्पना मांडत असतो. अनेक चुका दिसतात त्या दाखवत देखील असतो. परंतु अनेकदा आपण स्वतः त्याचे पालन करतो का हे पाहायचे विसरतो. खरं तर एक गोष्ट आठवते. मला जे सांगायचे ते त्या गोष्टीचे सार आहे.

नोंद, मी, विचार

सुधारणा

स्वतःमध्ये सुधारणा करणे म्हणजेच प्रगती करणे. अनेकदा आपण अनेक गोष्टी ठरवतो. त्यासाठी प्रयत्न करतो. कधी त्या यशस्वी होतात तर कधी अयशस्वी तर कधी त्या गोष्टी करणेच राहून जाते! असे होते कारण आपल्याला एकतर त्या गोष्टी करायच्या नसतात. किंवा आपल्याला त्यात फारसे काही जमत नसते.

राजकारण

विचारवंतांचे तांडव

आजकाल राजकारण म्हणजे वाईट असे म्हणणाऱ्या विचारवंतांची एक पिढी जन्माला आली आहे! ही प्रजाती सगळीकडेच आढळते. हे स्वतःला सकारात्मक समजतात. मी अन माझं घर हेच काय ते घोषवाक्य! बरं घोषवाक्याबद्दल काही म्हणणे नाही. परंतु ही जमात सर्वच राजकारण्यांना भोंदू, स्वार्थी व भ्रष्ट्राचार समजते. मुळात अशांना राजकारणाचा जाम तिटकारा आहे.