जीमेल आयडी कसा तयार करावा?

जीमेल ही जगातील सर्वात मोठी इमेल सेवा आहे. व्हॅट्सऍप आणि स्कायपी/फेसबुक मेसेंजरच्या युगात ह्याबद्दल फारसे बोलावे असे नाही. परंतु आजही व्यावसायिक पातळीवर इमेलला महत्व आहे. १.४ अब्ज लोक जीमेलचा वापर करतात. १ एप्रिल २०१४ (चौदा वर्षांपूर्वी) साली याची सुरवात झाली.  Continue reading “जीमेल आयडी कसा तयार करावा?”

ग्रामगीता – अध्याय पहिला २१

सुर्य जैसा नभी उगवला ।
अंधकाराचा नाश झाला ।
तैसा तूं हृदयीं प्रकटला ।
जीव झाला विश्वव्यापी ॥२१॥

– संत तुकडोजी महाराज

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला २१”

ग्रामगीता – अध्याय पहिला २०

यासीच पाहिजे सूर्यकिरण ।
अनेक मार्ग दिसती दूरून ।
अनुभवया आपुलें चिंतन ।
ध्येय – प्राप्तिरूपाने ॥२०॥

– संत तुकडोजी महाराज

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला २०”

पत्रकारिता एक धंदा!

काय बोलावं आणि किती बोलावं असा हा विषय! काल परवा एक घटना घडली. आता घटना अशी होती की जळगाव जिल्ह्यातील एका गावात दोन मुलांना पाण्याच्या विहिरीत विनापरवानगी पोहले म्हणून नागडं करून मारहाण केली. त्याचा व्हिडीओ देखील बनवण्यात आला. पत्रकारांनी नेहमीप्रमाणे अत्याचारित कोण आहे याची माहिती काढली तर दोघेही मातंग समाजाचे! आणि आरोपी जोशी आडनावाचा. झालं भली मोठ्ठी बातमी मिळाल्याचा आव आला आणि प्रत्येक चॅनेल/वृत्तपत्राचे पत्रकार धपाधप बातम्या टाकू लागले. Continue reading “पत्रकारिता एक धंदा!”

ग्रामगीता – अध्याय पहिला १९

तूंची खरा निश्चयी अविनाशी ।
कधीकाळांही न ढळशी ।
सर्व गुणज्ञान तुझेपाशी ।
हवे ते ते लाभती ॥१९॥

– संत तुकडोजी महाराज

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला १९”

ग्रामगीता – अध्याय पहिला १८

तारकेवरि दृष्टि धरली ।
तीचि स्वयें क्षणांत उडाली ।
तैसी गति होईल आमुची भली ।
विशाल मार्गी ॥१८॥

– संत तुकडोजी महाराज

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला १८”

ग्रामगीता – अध्याय पहिला १७

उजेडाकरितां काजवे धरावे ।
भुललिया मार्गी परतों जावें ।
तेथे स्वसंवेद्य कैसे व्हावें ।
निर्भयपणे ? ॥१७॥

– संत तुकडोजी महाराज

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला १७”

व्यवसायातील कानगोष्टी

गेले अडीच वर्षांपासून मी वेबसाईट डिझायनिंगचा व्यवसाय करतो आहे. त्याआधी साधारण नऊ वर्षे ह्याच क्षेत्रात नोकरी केलेली. व्यवसायात सुरु करण्यापूर्वी साधारण कधीही व्यवसाय न केलेल्या कुटुंबात ज्या सगळ्या गोष्टी घडतात तेच घडलेलं. घरच्यांना खरं तर हा धक्का होता. व त्यांना तो निर्णय अजूनही अनाकलनीय वाटतो. लाखभराचा महिन्याला खात्यात जमा होणारी नोकरी सोडून सगळंच अनिश्चित असलेल्या गोष्टीत पडायचं कशासाठी हा त्यांचा प्रश्न होता! Continue reading “व्यवसायातील कानगोष्टी”

ग्रामगीता – अध्याय पहिला १६

दुजा कोणा शरण जावें ।
तरी सर्वांगीण शक्ति केंवि पावें ?
एकेकाचे चरण धरावे ।
तरी वेळ जीवा फावेना ॥१६॥

– संत तुकडोजी महाराज

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला १६”

राजकीय भूमिका आणि आपण

अनेकदा असं म्हटले जाते की राजकारण्यांनी ह्या देशाचे वाटोळे केले आहे. पण ते वस्तुतः सत्य नाही. कदाचित हे मी मान्यदेखील केले असते. परंतु मला आलेले अनुभव नेमके उलटे आहेत. मी फार तज्ञ वगैरे नाही. परंतु सद्विवेकबुद्धी प्रत्येकाजवळ असते. सध्यस्थितीत जे चालले आहे हे आपल्या उदासीनतेचा परिणाम आहे. Continue reading “राजकीय भूमिका आणि आपण”