Posted on Apr 07, 2018

निष्पाप सलमान

Posted in ब्लॉग
Comments Post a Comment

खरंच किती अन्याय ह्या निष्पाप सलमानवर! न्यायसंस्था खंबीर आहे म्हणून बरं, नाहीतर ह्या क्रूर लोकांनी दयावान व भारताचा ब्लॅक डायमंड व आमच्या लाडक्या सलमानला त्रासून मारले असते. नाही मला तुम्ही सांगाच आता! फुटपाथवर गाडी घातली मग काय असं मोठं केलं. मान्य आहे आमच्या भाईने दारू ढोसलेली. बरं गाडी खाली कशाला यायचं लोकांनी? चूक त्या गरिबांची आहे. उलट आमच्या भाईनीं देश हिताचेच काम केलं. आता फुटपाथवर झोपायला काय बसायलाही लोक घाबरतात. आणि कुणी बसलेच तर झोपेतही सलमाची स्वप्न पडतात. देशकार्य केलं म्हणून पुरस्कार द्यायचा सोडून केस टाकली?

Posted on Apr 04, 2018

भाषा

Posted in ब्लॉग, विचार
Comments Post a Comment

थोड्यावेळापूर्वीच सोसायटीतील एका सभासदाच्या भावाचा फोन आलेला. प्रसंग अगदी सोपा! सोसायटीच्या भिंतींवर दोन दिवसापूर्वी परस्पर दोन तीन ठिकाणी स्वतःची सदनिका विकण्याची जाहिरातीचे पत्रक लावलेली. माझ्या सांगण्यावरून सुरक्षारक्षकाने ती काढलेली. अपेक्षेप्रमाणे साहेबांचा फोन आलेला. मी देहूरोड इथे राहतो. मला न विचारता आपण ती पत्रके कशाला काढलीत वगैरे वगैरे (खरं तर संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने मी विचारायला हवं होत!). मला खरं तर हसावं की रडावं तेच समजेना. साहेबांना ‘सेक्रेटरीशी बोला’ असं म्हणून मी फोन कट केला.

Posted on Apr 03, 2018

कायदा आणि आपण

Posted in ब्लॉग
Comments Post a Comment

खरं तर कायद्याविषयी काही बोलावं असं मनात नव्हतं. परंतु गेल्या काही काळापासून हे वातावरण या देशात आहे ते पाहता बोलणं भाग आहे. देशाला पुढे जायचं असेल तर तशी इच्छा आधी इथल्या लोकांमध्ये असणे जरुरी आहे. मी रोज घरापासून माझ्या कचेरीत येण्याच्या रस्त्यांमध्ये चौकाचौकात असलेल्या सिग्नल तोडणाऱ्यांचे प्रमाण पाहतो. घरी जातांना फुटपाथला लागून असलेल्या रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या दुचाकी आणि चारचाकी उभ्या गाड्या पाहतो. हातगाड्या आणि फेरीवाल्यांना पाहतो. पैशाशिवाय सरकारी काम होणार नाही अशी धारणा असलेल्या माझ्या सोसायटीतील सभासदांना पाहतो. रस्त्याच्या कडेला असलेला कचरा पाहतो. कचरा टाकणाऱ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पाहतो. मग मनात प्रश्न उभा राहतो की खरंच आपल्या लोकांची मानसिकता नेमकी काय आहे?

Posted on Apr 02, 2018

आधारकार्डला माझा विरोध कशासाठी?

Posted in आधारकार्ड, ब्लॉग
Comments Post a Comment

काही बोलण्याआधी काही स्पष्ट करावेसे वाटते. आधारकार्ड एक चांगली योजना आहे. परंतु ज्या प्रकारे तिचा आवाका वाढवला त्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना अशी योजना असावी ही त्यावेळचे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी चाचपणी झाली. त्यानंतर आलेल्या मनमोहन सिंह यांच्या काळात याला मूर्त स्वरूप आले. रेशन व अन्य काही गोष्टीपुरता याचा आवाका होता. २००९ साली निलेकेणी या इन्फोसिस संस्थापकांचा मार्गदर्शनाखाली एक कंपनी सुरु करण्यात आली. मला युआयडीएआयच्या इतिहासात जायचं नाही. थोडक्यात, सरकारने एका भागीदार झाले. मग काय नियम असतील. कायदा कसा असेल यातही निलेकेणी यांच्या सौ. कंपनीने सरकारला सल्ले दिले!

Posted on Dec 26, 2017

ज्ञानाचे भांडार

Posted in ब्लॉग
Comments 2 Comments

हे आंतरजाल भलतंच अफाट आहे. इथे काय नाही! जितकी माहिती हवी तितकी उपलब्ध आहे. फक्त विचार करण्याची गरज आहे. गुगल महाराज आपल्या समोर हजारो लेख/तत्सबंधी माहिती आपल्या समोर एका चुटकी सरशी दाखवते. माहितीच्या आधारे अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात. अनेक नवनवीन गोष्टी त्यामुळे आपल्याला माहिती होऊ शकतात. मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे त्यामुळे सुटू शकतात. त्यातील काही महाकाय भंडारी माहिती आपल्याला थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो आहे!

Posted on Dec 18, 2017

मराठी वाढवण्याचे ध्येय आणि आपण

Posted in ब्लॉग
Comments Post a Comment

अनेकदा असे ऐकायला मिळते की मराठीची गळचेपी होते आहे. खरं तर हा अनुभवाचा विषय आहे. काही ठिकाणी जाणून बुजून असे केलेही जात असेल. परंतु, माझ्या गेल्या काही वर्षातील अनुभव मी सांगणार आहे. कदाचित इतरांचा अनुभव वेगळा असू शकेल.

Posted on Dec 13, 2017

पुनः श्रीगणेशा!

Posted in ब्लॉग
Comments 3 Comments

बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर पुन्हा ब्लॉगकडे वळलो आहे. यावेळी अनेकदा घडले तसे सातत्य तुटणार नाही याची काळजी घेईल. अनेकदा ठरवायचो की ब्लॉग पुन्हा चालू करूयात परंतु कधी वेळेमुळे तर कधी केलेल्या केलेल्या कंटाळामुळे राहून जायचे! अनेक गोष्टी आहेत ज्या बोलायच्या आहेत. अनेक विषय असे आहेत. जे पोहोचावं असं वाटतंय. तपासासाठी पुन्हा ही धडपड करत आहे. मधल्या काळात ट्विटरवर रमलेलो! पण ब्लॉग काही केल्या विसरता येईना!

यावेळी परंतु ठरवून आलेलो आहे. ज्ञान, विज्ञानतंत्रज्ञान आणि हो माझ्या ‘मी‘ ह्यावर तर नक्कीच बोलेन! तूर्तास फार काही पकवत नाही!

Scroll to top