क्षमा असावी.. महाराज

राजे आम्हाला क्षमा करा! खरच आमच चुकल. महाराज तुमचा २०२० मध्ये इतिहास कसा असेल? कसा बदलला जाईल. यावर हा बापडा बोलला. राजे आता काय बोलायचं? वर्तमान काय वर्णावा. आपले मावळे, आपल्याच मावळ्यांची उणीदुणी काढत बसले आहे. कुणा मावळ्याला वाटत माझीच जात ‘लय भारी’. आणि दुसऱ्याची जात ‘राक्षसाची’. बर राजे तुम्हीच सांगा. Continue reading “क्षमा असावी.. महाराज”

शब्दांच्या कोलांट्या उड्या

संध्याकाळी कंपनीतून सुटल्यावर घरी येत असताना चिंचवडमधील चाफेकर चौकात एक भले मोठे पोस्टर लावले होते. त्यावर प्रत्येक तासाला ‘फ्री गिफ्ट’ जिंका अस लिहिलेलं होते. पोस्टर छान होत पण ‘फ्री गिफ्ट’ म्हणजे काय?. गिफ्ट नेहमी ‘फ्री’ च असत ना, जर गिफ्ट विकत असेल तर त्याला कोणी गिफ्ट कसे म्हणेल? पोस्टर मधील ‘फ्री गिफ्ट’ शब्द वाचून हसू आले. आज दुपारी जेवण करत असताना माझ्या सहकारणीला सहजच विचारल की ‘तू दिवाळीत फटाके उडवतीस का?’ तर त्यावर ती म्हणाली ‘मी फटाके फोडते आणि पतंग उडवते’. यावर सगळेच हसू लागले. पण या वाक्यावरून तीने माझी उडवली होती. पण छान कोटी केली होती. Continue reading “शब्दांच्या कोलांट्या उड्या”