स्वभाव

स्वभाव ही खुपंच मजेदार गोष्ट आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. स्वभाव म्हणजे नेमक काय हे सांगता येणार नाही. आपले वागणे म्हणजे स्वभाव अस म्हणणे चुकीचे वाटते. कारण, व्यक्तीनुसार आपले वागणे बदलते. हो, खरंच! स्वतःचे निरीक्षण करून पहा. मी जसा घरी असतांना वागतो. तसा बाहेर किंवा इतर ठिकाणी वागत नाही. सर्वांचेच जवळपास असेच असते. पण ‘स्वभाव’बद्दल सगळीकडे सारखाच असतो. माझा एक मित्र आहे. त्याला राग आल्यावर तो, समोरच्या व्यक्तीला मनाला टोचेल असे बोलतो. किंवा अनेकदा त्याला न पटलेल्या गोष्टीत देखील मन दुखावेल अस बोलून जातो. आता त्याच्या घरी देखील तो तसाच आणि बाहेरही तसाच. Continue reading “स्वभाव”

अर्धवट गोष्ट एका मंदिराची

एक आटपाट नगरात एका नदीतीरी एक भव्य मंदिर होते. मंदिर होते एका मर्यादा पुरुषोत्तमचे. न्याय आणि सुराज्याचे दुसरे नाव. असा तो. तर लोकहो, बाबर नावाच्या एका परकीय शत्रूने त्या नगरीवर हल्ला करून ती जिंकली. त्या मर्यादा पुरुषोत्तमचे मंदिर देखील पाडले. तिथे त्याने स्वतःच्या नावाची एक मशीद उभारली. पण तिथे कधीही नमाज पढला गेला नाही. शतकामागून शतके उलटली. पुढे जावून त्या देशावर ब्रिटीशांचे राज्य आले. तिथल्या लोकांनी आपल्या मर्यादा पुरुषोत्तमचे मंदिर उभारण्यासाठी ब्रिटिशांना विनंती, अर्ज करण्यात आले. पण ब्रिटीश सरकार मानेना. Continue reading “अर्धवट गोष्ट एका मंदिराची”