पत्रकारिता एक धंदा!

काय बोलावं आणि किती बोलावं असा हा विषय! काल परवा एक घटना घडली. आता घटना अशी होती की जळगाव जिल्ह्यातील एका गावात दोन मुलांना पाण्याच्या विहिरीत विनापरवानगी पोहले म्हणून नागडं करून मारहाण केली. त्याचा व्हिडीओ देखील बनवण्यात आला. पत्रकारांनी नेहमीप्रमाणे अत्याचारित कोण आहे याची माहिती काढली तर दोघेही मातंग समाजाचे! आणि आरोपी जोशी आडनावाचा. झालं भली मोठ्ठी बातमी मिळाल्याचा आव आला आणि प्रत्येक चॅनेल/वृत्तपत्राचे पत्रकार धपाधप बातम्या टाकू लागले. Continue reading “पत्रकारिता एक धंदा!”

व्यवसायातील कानगोष्टी

गेले अडीच वर्षांपासून मी वेबसाईट डिझायनिंगचा व्यवसाय करतो आहे. त्याआधी साधारण नऊ वर्षे ह्याच क्षेत्रात नोकरी केलेली. व्यवसायात सुरु करण्यापूर्वी साधारण कधीही व्यवसाय न केलेल्या कुटुंबात ज्या सगळ्या गोष्टी घडतात तेच घडलेलं. घरच्यांना खरं तर हा धक्का होता. व त्यांना तो निर्णय अजूनही अनाकलनीय वाटतो. लाखभराचा महिन्याला खात्यात जमा होणारी नोकरी सोडून सगळंच अनिश्चित असलेल्या गोष्टीत पडायचं कशासाठी हा त्यांचा प्रश्न होता! Continue reading “व्यवसायातील कानगोष्टी”

राजकीय भूमिका आणि आपण

अनेकदा असं म्हटले जाते की राजकारण्यांनी ह्या देशाचे वाटोळे केले आहे. पण ते वस्तुतः सत्य नाही. कदाचित हे मी मान्यदेखील केले असते. परंतु मला आलेले अनुभव नेमके उलटे आहेत. मी फार तज्ञ वगैरे नाही. परंतु सद्विवेकबुद्धी प्रत्येकाजवळ असते. सध्यस्थितीत जे चालले आहे हे आपल्या उदासीनतेचा परिणाम आहे. Continue reading “राजकीय भूमिका आणि आपण”

दिनक्रम

दिनक्रम ही अशी गोष्ट आहे की जी जीवन बदलून टाकते. काहीवेळा आयुष्य देखील उलथवून टाकू शकते. दिनक्रम खरं तर पाळणे खूपच अवघड गोष्ट आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून माझ्याकडून पाळला जातो आहे. खरं तर काही दिवसांपूर्वीपर्यंत मी जी गोष्ट ठरवायचो ती ठरल्याप्रमाणे होणार नाही अशीच परिस्थिती होती. पण आता बऱ्यापैकी त्यावर मात केली आहे. Continue reading “दिनक्रम”

मोदी भक्तांची लक्षणे

भक्त कोण हे ओळखणे अतिशय सोपे व साधे आहे! भक्तांचे पहिले लक्षण! ते ‘अति सकारात्मक’ असतात. मग नोटबंदी असो वा अन्य कोणतेही प्रश्न! त्यांच्याकडे प्रत्येकाचे उत्तर असते! आणि तुम्ही जोपर्यंत निरुत्तर होणार नाही तोपर्यंत हे स्वतःचा वेळ खर्च करून तुमचे मत बदलण्यासाठी ते प्रयत्न करतात. Continue reading “मोदी भक्तांची लक्षणे”

कोणता व्यवसाय करू?

व्यवसाय हा कोणत्याही गोष्टीचा होऊ शकतो. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी शाळा हे शिकण्याचे माध्यम असेल. परंतु शाळेत विद्येच्या बदल्यात मिळणारे वेतन हे शिक्षकांसाठी व्यवसायरूपी साधन असते. चहाची टपरी ते हॉटेलपर्यंतच्या गोष्टी व्यवसायात मोडतात. तेच काय आजकाल फेसबुक, ट्विटर हे देखील व्यावसायिक साधने झाले आहे. Continue reading “कोणता व्यवसाय करू?”

सरकार आणि आपण

सरकार म्हणजे कोण? हा प्रश्न बहुदा आपल्या देशातील १% देखील नागरिकांना कधी पडला नसेल. हा अज्ञानाचा विषय नाही तर हा लोकशाही व राजकारणाकडे दुर्लक्षण्याचा प्रकार आहे. राजकारणी चुकले यात शंका नाही. पण सामान्य माणूस कधी यावर विचार करत नाही. अथवा त्याला आहे त्या परिस्थिती मार्ग काढणे अधिक योग्य वाटते. Continue reading “सरकार आणि आपण”

जो तेरा है वो मेरा…

एक ‘हवेची शेपूट’ नावाची मोबाइल नेटवर्क सेवा पुरवणारी कंपनी आहे. तसं कंपनीचे महात्म्य अनेकांच्या तोंडून ऐकल्याने, मी कधी तिच्या वाटेने गेलो नव्हतो. आता घरच्यांच्या आग्रहास्त घेतलं शेपटीचे एक सिम. मग तिथून झाली या ‘करुण कहाणी’ची सुरवात. म्हणजे ती ‘शेपूट’ कधी कधी सापडायची. कोकणच्या वेड्यावाकड्या वळणात तर सोडाच पण हायवेच्या सरळ सपाट गुळगुळीत रस्त्यातही ती कधी मुळी मला सापडलीच नाही. Continue reading “जो तेरा है वो मेरा…”

एक छोटी बातमी डोंगरा एवढी..

रात्री एक भयानक घटना घडली. घडलेली घटना खर तर खूपच चीड आणणारी होती. कोणत्याही व्यक्तीच (राजकारणी सोडून) डोके फिरेल अशी होती. घडलेल्या घटनेने सारा देश हादरला. झालं! निमित्त सापडलं. ‘सबसे तेज..’ वाल्यांपासून ते ‘एक पाउल पुढे..’ पर्यंत सर्वांनीच त्या घटनेचे रुपांतर ‘टीआरपी’ मध्ये बांधण्याचा चंगच केला. Continue reading “एक छोटी बातमी डोंगरा एवढी..”

रामाने फळे आणली..

आजच्या मिडीयाला ‘रामाने फळे आणली’ या वाक्याची बातमी करायची झाल्यास…

सकाळ – अखेर रामाने फळे आणली.

महाराष्ट्र टाईम्स – रामाने फळे आणली?

लोकमत – नाईलाजास्तव रामाने फळे आणली.

सामना – रामाने फळे आणली. सर्वत्र जल्लोष.

पुढारी – रामाने फळे, फुले आणली.

टाईम्स ऑफ इंडिया – रामाने केवळ फळेच का आणली?

डी एन ए – रामाने फळेच आणली.

टाईम्स नाऊ – रामाने फळे कशासाठी आणली?

आज तक – ब्रेकिंग न्यूज : रामाने फळे आणली..

दूरदर्शन – राम आज फळे घेऊन आला.

आय बी एन लोकमत – रामाने टोपलीभर फळे आणली.

झी चोवीस तास – झी चोवीस तास इफेक्ट : रामाला फळे आणावीच लागली.

एन डी टीव्ही इंडिया  – राम फळे घेऊन परतला.

इंडिया टीव्ही – रामाने परत फळेच आणली..

आस्था – रामाने फळांची भेट आणली..