दुसर्याची उणीव पाहतां हसणें ।
दुसर्याची आपत्ति पाहून पळणें ।
दुसर्याचें वैभव देखोनि जळणें ।
होतें ऐसें ॥१३॥– संत तुकडोजी महाराज
Apr 10, 2018
दुसर्याची उणीव पाहतां हसणें ।
दुसर्याची आपत्ति पाहून पळणें ।
दुसर्याचें वैभव देखोनि जळणें ।
होतें ऐसें ॥१३॥– संत तुकडोजी महाराज
परि आम्ही वंचित दर्शनासि ।
परसुखें आनंद कुठला आम्हांसि?
आपुल्या स्वार्थे अल्पसंतोषी ।
मानतो स्वर्ग ॥१२॥
– संत तुकडोजी महाराज
ज्यासि तुझें दर्शन घडलें ।
त्यास कैंचे परके राहिले? ।
सर्व विश्वचि झालें आपुलें ।
दिव्यपणीं ॥११॥
– संत तुकडोजी महाराज
जेव्हां तुझे दर्शन घडे ।
उघडतीं विशाल ज्ञानाची कवडें ।
मग मी – तूं – पणाचे पोवाडे । कोठचे तेथे? ॥१०॥
– संत तुकडोजी महाराज
तुझ्या शक्तीची ही पूर्णावलि ।
अजूनि नाही जीवाभावांत शिरली ।
म्हणोनीच अज्ञानदशा उरली ।
आम्हांपाशी ॥९॥
– संत तुकडोजी महाराज
त्यासि नाही उरला भ्रम ।
विश्व आपणासह झाले ब्रह्म ।
तो जे जे करील तें तें कर्म ।
पूजाच तुझी ईश्वरा ! ॥८॥
– संत तुकडोजी महाराज
अर्थ: त्याच्या सर्व भ्रामक गोष्टी पूर्णपणे संपुष्टात आल्या म्हणून संपूर्ण विश्व आणि त्याच्या बरोबर ब्रह्म म्हणून त्याला दिसते. त्यामुळे त्याच्या सर्व कृत्यांनी तुमची पूजा करण्याचा प्रकार बनला.
गुरूशिष्य एकाच स्थळीचे ।
भिन्न नाहीत पाहतां मुळींचे ।
सुखसंवाद चालती भिन्नतत्वाचे ।
रंग रंगणी आणावया ॥६॥
– संत तुकडोजी महाराज
नाना चातुर्यकला – व्यापें ।
आपणचि गाये नाचे आलापे ।
प्रसन्न होऊनि आपणचि सोपें ।
भक्तिफळ दावी ॥५॥
– संत तुकडोजी महाराज
गणेश , शारदा आणि सदगुरू ।
आपणचि भक्तकामकल्पतरू ।
देवदेवता नारद तुंबरू ।
आपणचि जाहला ॥४॥– संत तुकडोजी महाराज