चर्चेखेरीज अन्य पर्याय नाही

आजोबांनी कालच आम्ही भांडू शकत नाहीत. आणि गप्पा मारणे याखेरीच काही पर्याय नाही अस स्पष्ट केल. आता सौदी अरेबियात आहेत. काही नाही थोडी हवा पालट. अस कस तीन दिवस सुट्टी नाही का? आजोबा २७ तारखेपासून एक मार्च पर्यंत आहेत तिथे. तिथल वातावरण चांगल आहे म्हणे. पण यावेळी आजोबा खूप वेळ भारतात होते. याआधी हवामानाच काही तरी चर्चा होती म्हणे त्या कोपनहेगनमध्ये. आता आपल्या इथलं उष्ण तापमानामुळे अस जाव लागत. दोन दिवस होते. सतरा आणि अठरा डिसेंबरला. पण तिथला हवामान बिघडलं म्हणून मग ते लवकर इथ आले. त्या आधी आपल्या जवळच्या रशियात गेले होते. सहा डिसेंबर ते आठ डिसेंबर. पण खुपच थंडी होती म्हणे तिथे. बर आजोबांचे वय काय आणि असा धावता प्रवास म्हटल्यावर दगदग होते. रोज काय केल हे आजोबा आजींना सांगतात हो. मग आजी म्हणाल तसचं बोलतात. आणि ह्या वयात काय आणि कसल्या गोष्टींची अपेक्षा करतात तुम्ही नातवंड? ते काही नाही, आजोबा शेजारच्यांनी भांडणार वगैरे काही नाही. Continue reading “चर्चेखेरीज अन्य पर्याय नाही”

सुट्ट्यांचा देश

काल त्या महानगरपालिकेच्या ‘माहिती अधिकार’ विभागात अर्ज देण्यासाठी गेलो. बर, चिंचवडमधील ‘माहिती अधिकार’ विभागाचे कार्यालय चाफेकर चौकात. पण हेच ते कार्यालय हे त्या त्याच्या बाजूच्या रिक्षावाल्याला देखील माहित नव्हते. तासभर फिरल्यावर शेवटी मला त्या बसपास केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगतले. बर जाऊनही काही फायदा झाला नाही. सुट्टी होती. तीन दिवस सुट्टी आहे. तशी मलासुद्धा तीन दिवस सुट्टी आहे. जगात सगळ्यात जास्त सुट्ट्या आपल्या देशात मिळतात अस मी एका वर्तमानपत्रात वाचाल होत. खर आहे. त्या बसपास केंद्रातील अधिकाऱ्याला विचारलं की ‘माहिती अधिकार’ कार्यालयाला कधी सुट्टी असते? तो म्हणाला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. आणि रविवारी आठवड्याची सुट्टी. बर म्हणून महानगरपालिकेत गेलो तर तिथे देखील तेच. तिथून निघाल्यावर सुट्ट्याबद्दल विचार करत होतो. ते रेशनकार्ड वेळी देखील असंच. मागील वर्षी चौकशी गेलो की आता काय तर अमुक अमुक जयंती नंतर गेलो तर यांची पुण्यतिथी. नंतर काय तर दिवाळी. मग काय तर नाताळ. मस्त आहे. Continue reading “सुट्ट्यांचा देश”

नेट आहे तुजपाशी

काल कंपनीत काम करत असताना खूप अडचणी आल्या. एक तर दोन महिने काही काम दिल नाही. आणि आता दिल तर ते ताबडतोप हव. आता नुसत बसून राहिल्याने माझ्या कामाचा वेग कमी झाला आहे. मग त्यात एखादी नवीन गोष्ट आली की माझी गोची होऊन जायची. मग काय नेट जिंदाबाद. थोड फार शोधल की अडलेल काम कस करायचं याची सगळी माहिती यायची. त्यामुळे दिवसभर शोध मोहीम आणि काम मस्त झाल. आणि अनेक नवीन गोष्टी समजल्या. संध्याकाळी घरी आल्यावर इंग्लिश स्पिकिंगाची काही माहिती घ्यावी म्हणून संगणकावर बसलो. तर वर्षभर पुरतील एवढी माहिती. आता काय गरज आहे ‘इंग्लिश स्पिकिंग’ क्लासची? आणि सराव करायचा झाला तर आहेच ना ‘कस्टमर केअरवाले’. अजून काय हव आहे? फक्त सुरवात करायची गरज आहे. कुठेही जाऊन पैसे खर्च करायची गरज नाही. Continue reading “नेट आहे तुजपाशी”

झोप

आई गावी गेल्यापासून सगळाच गोंधळ चालू आहे. रात्री झोपायला उशीर. आणि मग उठायला सुद्धा उशीर. आणि त्याचा परिणाम सगळीकडे होत आहे. काल कहर झाला. उठलो नऊ वाजता. दहाच्या कंपनीच्या बससाठी गेलो. बस आली, आणि मग लक्षात आल की माझ ओळखपत्र, बसपास आणि कंपनीच एक्सेस कार्ड विसरलं म्हणून. मग परत मागे फिरव तर बस जाईल. आणि कंपनीत जायला आणखीन उशीर होईल. शेवटी बसमध्ये बसलो. आजकाल रोज काही ना काही नवीन घडते. त्या माझ्या थांब्यावर माझ्यासोबत आणखीन एक जण बस मध्ये चढला. आणि नंतर माझ्या.. चुकून त्याच्याकडे बघून ओळख दाखवली आणि काय तो सुरूच झाला. कुठून त्याला ओळख दाखवली अस झाल. माझा बसमध्ये बसल्यावर ‘झोप’ हा एक कलमी कार्यक्रम चालू असतो. Continue reading “झोप”

रेल्वे

काल ममताजीन रेल्वे बजेट सादर करायला सकाळी घरातून निघाल्या असतील. आणि इकडे आमच्या चिंचवडमध्ये सकाळची सात वीसच्या लोकलच्या कृपेने ती ओव्हरहेड वायर तुटली. मग काय पुढच्या लोकल रद्द आणि मुंबईला जाणाऱ्या एक्सप्रेस तासभर उशिरा सुटल्या. डेक्कन क़्विनने पिंपरीत तासाभराची विश्रांती घेतली. तीच्या विश्रांतीनंतर प्रगती, सह्याद्री देखील तासभर उशिराने निघाल्या. सगळ्या लोकल प्रवाश्यांचे हाल झाले. तस हा योगायोग जरी घडला असला तर ममताजींनी जे बजेट सादर केल ते खरच खूप चांगल होत. मुंबईत एकशे एक नवीन लोकल, मुंबई शिर्डी इंटरसिटी एक्सप्रेस सारख्या अनेक गाड्या सुरु केल्या आहेत. ममताजींनी जे केल त्यामुळे खर तर त्याचं अभिनंदन करायला हव. आज मी त्यांना ‘धन्यवाद’ चा एक इमेल टाकणार आहे. जमल्यास तुम्हीही टाका. Continue reading “रेल्वे”

जंगलराणीच अभिभाषण

माननीय सदस्य ‘प्राणी’ गण,
या नव्या दशकात दोन्ही गुहेतील पहिल्या सत्राला आपण सगळे उपस्थित आहात. मी तुमचे स्वागत करते (म्याऊ..). मला हा विश्वास आहे की तुम्ही सर्व जण या जंगलाला समृद्धीच्या दिशेने आणि विश्वात एका उच्च जागी नेण्यासाठी समर्पित होऊन काम कराल आणि गौरवपूर्ण दशक बनवाल. पुढे अजून शिकारी करायच्या आहेत म्हणून तुमच लक्ष अपेक्षित आहे.

मी त्या मुंग्यांच्या कुटुंबियासाठी दुखः प्रकट करते ज्यांचे प्रियजन पुण्याच्या दहशदवादी हल्ल्यात गमावलेले आहेत. नक्षली लांडग्यांची हिंसा पश्चिम बंगालच्या जंगलात चालूच आहे. ज्यात अनेक निष्पाप प्राणी मारले गेले आहेत. अशा प्रकारच्या गोष्टी आम्हाला त्याविरुद्ध लढण्याला अधिक दृढ करतात. माझे ‘मनीसिंह’ च्या सरकारने त्या नक्षली लांडग्यांना हिंसा सोडून गप्पा मारायचा बोलावलं आहे. प्राण्यांच्या प्रशासनाला सुदृढ करणे आणि सर्वांगीण लाभ देण्याची योजना आमच्या दृढ ध्येय्याने चालू राहतील. Continue reading “जंगलराणीच अभिभाषण”

मेट्रो

पुण्यात ‘मेट्रो’ रेल्वेचा प्रकल्प सुरु होणार आहे. खर्च दहा हजार कोटी. या शनिवारी आमच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आठ टक्के करवाढ मंजूर करून घेतली आहे. १०५ नगरसेवकांपैकी ३४ नगरसेवकांनी करच्या बाजूने मतदान केले. आणि अनेक नगरसेवक गैरहजर राहिल्याने तो प्रस्ताव मंजूर झाला. आता तो जो ‘मेट्रो’ रेल्वे प्रकल्प सुरु करण्याचा हट्ट आमच्या दोन्ही महानगरपालिकांनी घेतला आहे त्यापैकी एकाही महानगरपालिकेकडे पैसे नाहीत. काल परवापर्यंत बीआरटी च्या बसेस ३३० कोटी खर्च करून १५०० बसेस खरेदी या दोन्ही महानगरपालीकेंना जास्त खर्चिक वाटत होत्या. आता दहा हजार कोटी ही रक्कम लहान वाटत आहे. काय गणित आहे कुणास ठाऊक? बर स्वारगेट ते वाकडेवाडी मध्ये याचा पहिला टप्पा होणार आहे. इथे रस्त्याला जागाच नाहीत. आणि हे भुयारी मार्ग कुठून काढणार देव जाणे. Continue reading “मेट्रो”

गाव

नगर जिल्हातील वांबोरी नावच गाव आहे. या शनिवारी सकाळी शिवाजीनगरहून नगर बस पकडली. ‘विनाथांब’ बस होती. सहाच प्रवासी बसमध्ये. एक चालक, एक वाहक पकडून आठ. व्ही.आय.पी असल्याप्रमाणे वाटत होत. पुणे नगर महामार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. सव्वा दोन तासात नगरला. नगरहून ‘वांबोरी’ बस पकडली. घरी गेल्यावर नेहमी प्रमाणे ‘वीज’ नव्हती. संध्याकाळी माझ्या गावातील मित्रांसोबत बाहेर फिरायला गेलो. गाव लहान असेल तरी तीस हजाराची लोकवस्ती आहे. घरी पुन्हा येताना शिवसेना, भाजप, मनसे यांच्या नवीन पाट्या बघितल्या. गावात आजकाल राजकारण जोरात आहे. दरवर्षीप्रमाणे ‘रामायण’ या विषयावर सप्ताह चालू झालेला आहे. गाव जरा जास्तच धार्मिक आहे. माझे वडील आई आणि जवळपास संपूर्ण गावच संध्याकाळी सप्ताहात असते. रात्री वीज राहिल्याने मुळा प्रवरा वीज मंडळाचे उपकार मानले. Continue reading “गाव”

नोकरी

परवा माझ्या एका मित्राचा दोन वर्षांनी फोन आला होता. मला म्हणाला ‘मी आता बी.सी.ए च्या तिसऱ्या वर्षाला आहे. यापुढे एम.सी.ए करायचे म्हणतो आहे. तर मग मला नोकरीसाठी काही अडचण येणार नाही ना?’ मी  ‘नाही’ येणार अस म्हणून फोन ठेवला. काल संध्याकाळी माझ्या मैत्रिणीचा की माझ्या एक मित्र तिला भेटला होता. तर ती मला सांगत होती ‘तो खूप टेन्शनमध्ये होता. त्याला तू काय झाल विचार’. मी ‘हो’ म्हणू फोन ठेवला आणि त्या माझ्या मित्राला फोन केला. त्याला विचारलं काय झाल तर तोही नोकरीच्या शोधात होता. आता तो शोधात आहे हे माहिती होत पण सहा महिन्यात एक कंपनी भेटू नये? त्याला विचारलं अडचण काय आहे तर बोलला की माझी कंपनी सहा महिन्यापूर्वी बंद पडली. आता कुठेही मुलाखत दिली तरी देखील कुठे नोकरी मिळत नाही आहे. नीट बोलल्यावर त्याच्या इंग्लिशची अडचण लक्षात आली. येत असून देखील ते दाखवता येत नाही. पुढच्या आठवड्यात आम्ही भेटणार आहोत. Continue reading “नोकरी”

अपेक्षा

काल संध्याकाळी माझ्या काकाने मला घरी येताना माझी पत्रिका आणि एक फोटो आणायला सांगितला. घरी गेलो तर एक गृहस्थ आले होते. माझी पत्रिका आणि फोटो घेतला. असो, माझ्याकरिता त्यांनी एक स्थळ आणल होत. माझ्याबद्दल माहिती विचारली. सगळ झाल्यावर तुमची मुली बद्दलची अपेक्षा काय अस विचारलं. काय बोलणार, त्यांना म्हणालो की ‘विश्वास’ ठेवता यायला हवा. ते म्हणाले ‘विश्वासावरच सगळ चालत. अजून काही अपेक्षा असतील ना?’ त्यांना म्हटलं ‘माझ्या फार काही अपेक्षा नाही’. ते ‘बर’ म्हणून निघून गेले. याआधीही असच, ते आधी आलेले स्थळ देखील  ‘अपेक्षा काय?’ आता या सगळ्यांच्या अपेक्षेचा अर्थ असा की, मला मुलगी दिसायला गोरी हवी? किंवा ती नोकरी करणारी हवी? मग नोकरी करत असेल तर पगाराची अपेक्षा काय? मग हे नाही तर तिला स्वयंपाक, तीच शिक्षण, तिची शरीरयष्टी, तिला चष्मा हवा की नको? हे असले प्रश्न मी ऐकले की वाटत मला एखादी वस्तूच विकत घ्यायची आहे. आणि ते मला वस्तू कशी हवी अस विचारात आहेत. Continue reading “अपेक्षा”