लग्न

कालपासून काहीच सुचत नाही आहे. परवा वडिलांचा आणखीन एका स्थळबद्दल फोन आला होता. त्यात हे डोक दुखण्याचे कमी होत नाही आहे. बहुतेक पुढच्या महिन्यात ते स्थळ पाहण्याचा कार्यक्रम ठरेल. ‘अप्सरा’ बद्दल बहिणाबाईशी बोलायला परवा गेलो होतो. पण तीच ‘सॉफ्टवेअर मधील नको’. काय बोलू आता तिच्याशी. आईने बहिणाबाईला फोन केला होता. ते आधी म्हटले ना मी मागील दोन आठवड्यापूर्वी पाहिलेले ते ‘सोलापूर’च्या स्थळाबद्दल. मी चुकून ‘सांगली’ म्हटले. क्षमा असावी. आत्ता वडिलांचा पुन्हा फोन आला होता ‘की त्या स्थळाचा सारखा फोन येत आहे. त्यांना काय सांगायचे म्हणून’. आता माझ्या आई आणि वडिलांना ते स्थळ पसंत पडलेले आहे. पण मला काहीच वाटत नव्हते. म्हणजे सगळे छान आहे त्या स्थळाचे. फक्त काय तो ‘लुक’ नाही. बाकी सर्व व्यवस्थित. Continue reading “लग्न”

डोक

आज डोक जाम दुखत आहे. कशामुळे त्याचे कारण कळत नाही आहे. आता मला डोके आहे की चर्चा नको. उगाचंच, ‘लोकसभा’ नको. तिथे देशातील सर्वात हुशार प्राणी आपली कला सादर करीत असतात. आता त्यांना डोक आहे की नाही यावरही चर्चा नको. उगाचंच, एकमत होईल. तसे म्हटले तरी ते देखील हाच विचार करीत असतील. कारण आपणच त्यांना तिथे बसवतो. मग पुढे ते काय करतात ते दिसतेच आहे. Continue reading “डोक”

हेडफोन

कानातले घातल्याशिवाय आजकाल कोणी कुठेही जात नाही. म्हणजे ‘हेडफोन’ अस म्हणायचे होते. रोज सकाळी बसमध्ये जवळपास सर्वच ‘बुजगावणे’ ते कानातील घालून असतात. आज माझ्या शेजारी बसलेली सुद्धा! आणि बाईकवरील हिरो आणि होंडाना पर्याय नाही म्हणून की फॅशन म्हणून त्यांनाच माहित. माझे मित्र आहेत ना काही, बाईकवर रस्त्याच्याकडेला गप्पा मारतांना सुद्धा ते कानातील काढणार नाहीत. Continue reading “हेडफोन”

अप्सरा

कालपासून सगळंच बदललं आहे. गेल्या पाच वर्षात एकदाही आठच्या आत पहाट झाली नव्हती. पण काल मी सव्वा पाचला उठलो. आणि पळायला सुद्धा गेलो. जी घटना पाच वर्षापूर्वी फक्त एकदाच घडली होती. आणि आज तर बळजबरी पाचपर्यंत अंथरुणात पडून होतो. एक माझ्या कंपनीत मुलगी आहे. असो, देवाची कृपा म्हणायची आधी ज्या मला आवडल्या त्यांना मी नाही आवडलो म्हणून. ती एक अकबर बिरबलाची गोष्ट आहे ना! ‘जे होते ते चांगल्यासाठीच होते’. अगदी बरोबर आहे. मी उगाचंच देवाला नाव ठेवत बसलो होतो. Continue reading “अप्सरा”

गुरु पोर्णिमा

परवाच्या ताज्या बातम्या, ‘गुरु’पोर्णिमा धुमधडाक्यात साजरी झाली. आपल्या आजींनी आणि बडी बेगमने कारागृहात नाही तीर्थस्थळात जावून गुरूंचे दर्शन घेतले. गुरूंनी देखील मोठ्या मनाने आशीर्वाद दिला अस ऐकण्यात आले. आणि बेगम बरोबर मनमोहन खान होताच! गुरूंनी या सर्वांना त्यांची गुरुवाणीने या शिष्यांना मंत्रमुग्ध केले. पुढच्या वर्षी सगळे शिष्य मिळून गुरूला ‘देशाचे नागरिकत्वाची’ भेट देणार आहेत अस ऐकायला मिळालं आहे. Continue reading “गुरु पोर्णिमा”

पावसाचे थेंब

गेल्या दोन तीन दिवसांपासून इतके मस्त वातावरण आहे ना! पावसाचे थेंब असले छान पडत आहेत. आत्ता तर, सूर्य नाही पण सीएफएल चा प्रकाश पडावा तसा प्रकाश पडला आहे. एकदम मस्त! मी आत्ताच भिजून आलो आहे. लोक एवढी पावसाला का घाबरतात कुणास ठाऊक? पाऊस पडत असतांना आकाशात बघायचं, ते कोटी कोटी थेंब पडतांना असले जबरदस्त दिसतात ना! आणि रात्रीच्या वेळी तर विचारूच नका. रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात पहा कसले छान दिसतात थेंब. अस शॉवर चालू असल्यासारखे वाटते. वातावरणात एक प्रकारचे चैतन्य आहाहा! Continue reading “पावसाचे थेंब”

पासवर्ड

आता इतक्या वेबसाईटची अकौंट झाली आहेत ना! आणि प्रत्येकाचे ते यूझर नेम आणि पासवर्ड लक्षात ठेवणे म्हणजे दिव्य आहे. आज ते जीमेलाचा पासवर्डमध्ये गोंधळ झाला होता. आठवतच नव्हता. सहा महिन्यांपूर्वी युझर नेम आणि पासवर्डसाठी एक एक्सेलची फाईल बनवून त्यात आठवेल तितके यूझर नेम आणि पासवर्ड लिहून ठेवले होते. आणि त्याही फाईलचा पासवर्ड आता आठवत नाही. आता सगळेच पासवर्ड सारखे करायचा प्रयत्न केला होता. पण युझर नेमचे झंझटमुळे शेवटी सोडून द्यावी लागली. Continue reading “पासवर्ड”

ऊऊउऊऊ…

ओळखलं असेलच! आज त्या ऊउउssss चा वाढदिवस आहे. काहीही म्हणा पण त्याच्या गाण्याचे किती उपयोग आहे. म्हणजे परवाचीच गोष्ट. कंपनीतून निघतांना कंपनीची बसमध्ये खूप गर्दी झाली. बसमध्ये उभा राहून प्रवास केलेला चालत नाही. आणि बस खचाखच भरलेली. थोडक्यात पीएमपीएल झालेली. आणि बाहेर खूप पाऊस पडत होता. त्या ६:४५ च्या बसनंतर पुढची बस आठ वाजता असते. त्यामुळे कोणीही उतरायला तयार नव्हते. आणि एवढी गर्दी पाहून चालक देखील बस न्यायला तयार होईना. Continue reading “ऊऊउऊऊ…”

दादांची वाढदिवसाची भेट

‘जाणता पुतण्याचा’ फोन वाजला. डोळे चोळत अंथरुणातून पुतण्याने कुणाचा पहिला तर ‘काकांचा’. गडबडून गजराचे घड्याळ बघितली आणि ताबडतोप फोन उचलून ‘काका बोला’. तिकडून  ‘आले वाढदिवसाच्या शुभेच्छा!’. पुतण्या ‘तुमचे आशीर्वाद आहेत. पण काका माझा वाढदिवसाला अजून एक आठवडा बाकी आहे. तुम्ही तर आत्ताच शुभेच्छा दिल्यात’. तिकडून आवाज आला ‘आले, तुला माहिती आहे ना, मी कायम घड्याळाच्या पुढे चालणारा माणूस आहे!’. पुतण्या ‘हो! अगदी, म्हणून तर पक्षाचे चिन्ह..’. तिकडून काकांनी आवाज वाढवत ‘आले, ते घड्याळ तुझ्यासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी आहे. तुम्ही लोक खूप आळशी आहात. म्हणून मी ते घड्याळ घेतले’. ‘माफ करा काका’ पुतण्या उत्तरला. काका करड्या आवाजात ‘माफी असावी, अशी आर्जव किती करणार? परपक्षीय लोक जास्त सीट आणतात हे त्यांच्या हुशारी आणि शिक्षणामुळे..’. Continue reading “दादांची वाढदिवसाची भेट”

बुजगावणे

माझ्या कंपनी जवळपास सर्वच बुजगावणे काम करतात. ते शेतात आपण पाखरांना येऊ नये म्हणून चारा आणि लाकडांचा वापर करून एक ‘बुजगावणे’ बनवतो. त्याला कपडे घालतो. आणि उभे करतो. तसे, अगदी तसे आमच्या कंपनीत हे बुजगावणे आहेत. बसमध्ये बसले तर मानेचा साधा ४५ अंशाचा देखील करीत नाहीत. शेजारी कोण येऊन बसला. कोण गेला. यांना काहीच फरक पडत नाही. कधी चुकूनही स्वतःहून बोलणार नाहीत. एक तर नाकासमोर बघणार किंवा खिडकीतून बाहेर. आता मुलींना बुजगावणे म्हणणार नाही. कारण त्यांची ‘बडबड’वरून त्या जिवंत आहेत हे तरी कळते. Continue reading “बुजगावणे”