काकूंची कृपा

आज दुपारपर्यंत तिला एक मिनिट सुद्धा मला ढुंकून बघायला वेळ नव्हता. आणि मी पाण्यातून बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे. तडफडत होतो. काही नाही. एकदाचं माझ्या बाजूने गेली. पण मला न बघता. आज माझ्या मित्रांसोबत मी कंपनीच्या नवीन कॅन्टीनमध्ये गेलेलो. ती नेहमी तिथे जेवण करते. वाटलं ती तिथे असेल. पण गेल्यावर खूप शोधलं पण ती नव्हती. मग जागा शोधून एका ठिकाणी बसलो. माझ्या एका मित्राने ती आजकाल जुन्याच कॅन्टीनमध्ये जेवते अस सांगितले. मग माझाच मला राग आला. कशाला इकडे तडफडलो अस झालेलं. पण काही उपयोग नव्हता. कारण माझ्या सोबत असलेले दोन मित्र कुपन घेऊन रांगेत उभे होते. Continue reading “काकूंची कृपा”

पुन्हा तेच..

पुन्हा तेच. कस बोलू? यार आज ती खूप छान दिसत आहे. काल आजारी होतो. काही नाही. थोडा ताप आणि सर्दी. त्यात तो खोकला खूप कमी झाला आहे. पण गेलेला नाही. त्यामुळे कंपनीला बुट्टी झाली. तिची खूप आठवण आली. दिवसभर, झोपून होतो. मित्राचा सकाळी फोन आला होता. तेवढ्यापुरता उठलो. मग काय, त्याला विचारले ‘ती आली का?’ तर ‘नाही’ बोलला. तीन वाजता पुन्हा जाग आली. त्यावेळी मग मी मित्राला फोन केला. तर माझ्याशी ते टाईमपास करत बसलेले. मला म्हणाले ती आज टेन्शन मध्ये आहे. एक सेकंदसाठी खूप विचारांचे काहूर माजले, पण नंतर स्वतःला सावरले. Continue reading “पुन्हा तेच..”

चीड

मी शाळेत असतांना मला शाळेतील मित्र खूप चिडवायचे. अगदी दहावी पर्यंत. आणि मी चिडून देखील जायचो. मला ‘आठल्या पिठल्या’ म्हणायचे. आता हसू येत. पण त्यावेळी खूप राग यायचा. चौथी पर्यंत मी मग कोणी चिडवले की त्यांच्याशी भांडायचो. म्हणजे हाणामारी. तोंडाने काहीच नाही बोलायचो. आणि मग मी रडत आणि ते हसत घरी यायचो. अस चौथी पर्यंत चालले. मग वडिलांनी ‘कोणी चिडवले की त्याला मारायचे. पण त्याने एक ठोसा मारला की त्याला दोन ठोसे द्यायचे’ अस सांगितले. Continue reading “चीड”

शिवरायांचा इतिहास २०२०

शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. आता कधी झाला याची तारीख राज्यशासन ठरवेल त्या तारखेला झाला अस मानायला काही हरकत नाही. त्यांची आई जिजाबाई. त्यांचे वडील शहाजी राजे. शिवरायांचे शिक्षण पुण्यातील रोझरी स्कूलमध्ये झाले. त्यांना दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी, तुकाराम महाराज या सर्व टीचर्स ने शिकवले. पण यातील कोणीच त्यांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीजामातेच्या सांगण्यावरून तोरणा गड जिंकून ‘हिंदी स्वराज्याची’ स्थापना केली. आणि स्वराज्याची पताका म्हणून तिरंग्याची निवड केली. शिवरायांनी एकामागून एक असे अनेक किल्ले जिंकून स्वराज्य चौफेर पसरले. परंतु शिवाजी महाराज कट्टर अहिंसावादी होते. अगदी महात्मा गांधी प्रमाणे. शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव आदिलशहाला डोळ्यात खुपणारा होता. म्हणून आदिलशहाने अफझल खानला शिवाजी महाराजांना समजावण्यासाठी पाठवले. Continue reading “शिवरायांचा इतिहास २०२०”

इटलीची किटली

इटलीची किटली, युवराजला विमानात भेटली|
दिसताच युवराजच्या काळजात प्रेमाची आगच पेटली|
लगेचंच युवराजच्या प्रेमाची लावली तिने टिकली|
इटलीची किटली|| Continue reading “इटलीची किटली”

प्रेम आणि आकर्षण

म्हटलं तर फार फरक नाही. आणि म्हटलं तर खूप फरक आहे. म्हणजे खरं सांगतो. अप्सरा भेटण्याच्या आधी मला दर दहा मिनिटाला एक आवडायची. मुळात मुली एवढ्या सुंदर का असतात हाच न सुटलेला मला प्रश्न आहे. कालच्या त्या एका प्रतिक्रियेने मलाही थोडा वेळ असंच वाटलं होत, की मी अप्सराच्या सौंदर्यावर फिदा आहे? की मला ती खरंच आवडते? काल ती दिवसभर कुठे गायब झाली कुणास ठाऊक आणि त्यात ती प्रतिक्रिया. असंच अप्सरा बद्दल विचार करीत चाललो होतो. तर संध्याकाळची पाचची बस चुकली. मग आणखीन वैताग आला. कारण त्यापुढची बस ७:४५ ला. मग जणू काही जेल मध्येच आहे अस वाटायला लागले होते. ती नव्हती तर कंपनीत एक एक मिनिट काढणे खूप त्रासदायक वाटत होते. पुन्हा माझ्या फ्लोरवर जाण्यासाठी निघालो. मनात तिची इतकी आठवण दाटून आली होती ना! गंगा यमुना यायच्या बाकी होत्या. Continue reading “प्रेम आणि आकर्षण”

शोधू मी..

कुठे गेली यार ती! मी ना इतक्या ‘गाढवचुका’ करतो ना. माझा मलाच राग येत आहे. सकाळी ती कॅन्टीनमध्ये दिसली होती. आणि एकटी बसली होती. पण नेहमीप्रमाणे मी हिम्मतच नाही करू शकलो तिच्याशी बोलायची. आणि नंतर ती पुन्हा कुठे गायब झाली कुणास ठाऊक! अजूनही परतली नाही. मला खूप टेन्शन आल आहे. यार काय करू? डोके खूप दुखते आहे. सकाळपासून तिच्या डेस्ककडे पाहतो आहे. आज सुद्धा ती खूप छान दिसत होती. बोललो असतो तर काही फरक पडला नसता. आता दोन दिवस कसे जाणार? खरंच काही सुचेनासे झाले आहे. Continue reading “शोधू मी..”

सौंदर्याची देवी

काय सांगू आजचा दिवस कसा गेला ते!!! आज अप्सरा काय दिसत होती. ती इतकी छान आहे ना! आज माझ्याकडे शब्दच नाहीत काही बोलायला. एकतर ती इतकी गोरी गोरी पान, फुलासारखी छान.. आणि आज तीचा तो गुलाबी रंगाचा ड्रेस. तिला पाहून आज दिवसभर मला तिच्याशी काहीच बोलता नाही आले. खरंच ती इतकी सुंदर दिसत होती ना! आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आज खूप, खूप डब्बा. नाही खरंच, काल कुठून बुद्धी सुचली आणि केस कापायला गेलो अस झालं. आता मी म्हणजे ‘टकलू हैवान’. त्यात कालही गाढवपणा घडला. काल ती दुपारी माझ्याकडे बघून हसत जात होती. आणि मी तिला पाहून न पाहिल्याप्रमाणे केले. तिचे ते गोड हास्य! काय सांगू किती छान दिसत होती. आणि मी मुलीसारखा लाजून खाली मान घातली. आणि तीच्या मैत्रिणीकडे पहिले. यार, ती माझ्याकडे पाहते त्यावेळी माझी परिस्थिती हृदयविकाराच्या झटका येऊन शेवटचे काही सेकंद मोजत असलेल्या माणसाप्रमाणे होते. त्या क्षणाला मला काहीच सुचत नाही. आणि मग मी असल्या ‘गाढवचुका’ करतो. नंतर रात्रभर अप्सराने काय विचार केला असेल या विचाराने डोके खाल्ले. Continue reading “सौंदर्याची देवी”

मी एक मूर्ख

खूप आधीपासून बोलायचे होते. पण नेहमी मी टाळत होतो. म्हणजे अगदी त्या इमेलच्या प्रकरणाच्या वेळी. मागील मराठी दिनाला मी एक ओळीचा इमेल टाकला होता. त्यावर पुढे काही जणांनी त्या मेलचा वापर त्यांच्या ब्लॉगच्या प्रसिद्धीसाठी करून घेतला. तेव्हाच एकीने ‘मूर्ख आयटीवाला’ अशी पदवी दिली होती. तेव्हाच माफी मागितली होती पण अनेक ब्लॉग बंधूंनी माझी हवी तशी आणि हवे त्या भाषेत त्यांची मते दिली होती. आणि ती मते मला मान्य देखील होती. कारण ती चूक माझ्यामुळेच सुरु झाली होती. प्रत्येकाला हवी ती आणि तशी मते मांडण्याचा अधिकार आहे. आणि मला देखील ते मान्य आहे. मी देखील माझी मतेच मांडत असतो रोज. फरक फक्त इतकाच की मी, फक्त माझ्याच बद्दल बोलतो. मला काय वाटले, माझ्यासोबत काय घडले. बस्स! यापलीकडे मी जातच नाही. आणि गेलो तरी जेवढ्यापुरते तेवढेच. Continue reading “मी एक मूर्ख”

अप्सरा आली

आज सकाळी तिच्याशी बोललो. हुश्श! श्वास सोबतच देत नाही आहे. किती वाट पाहायला लावली तिने. चार दिवस! जातच नव्हते. काय सांगू? आज तिची ओढणीचा आणि माझ्या शर्टचा रंग एकच आहे. खूप छान वाटले. बोलतांना अस वाटत होते की, जवळपास चार वर्षांनी भेट झाली. आज ज्यावेळी ती सकाळी आली त्यावेळी नेहमीप्रमाणे तिच्याकडे पाहण्याची हिम्मतच होत नव्हती. कॅन्टीनमध्ये जाऊन आल्यावर तिच्या डेस्कपासून जातांना ती माझ्याकडे पाहत होती. मग केली हिम्मत बोलायची. आज पण ती किती छान दिसते आहे. यार, मी तिच्याबद्दल बोलण्यापेक्षा तीच माझ्या बद्दल विचारात असते. नेहमी मी कुठे राहतो हे विचारते. Continue reading “अप्सरा आली”