वजन

वजन हा गेल्या काही दिवसांपासून खुपंच जिव्हाळ्याचा विषय होऊन गेला आहे. खर तर पोटाचा वाढता ‘नगारा’ हा त्याहून अधिक जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. पण सध्यातरी वजनावरच बोलू. आता वजन किती असावं यावर चर्चा करायला फार काही महान नाही. पण साधारणपणे जितके इंच उंची, तितके किलो वजन असायला हवं, अस वडील नेहमी बोलतात. तेवढे असेल तर सुधृढ. कमी असेल तर लुकडा, आणि जास्त असेल तर जाड. आता माझी उंची पाच फुट पाच इंच (१६५ सेंटीमीटर) आहे. तसा हिशोब पकडला तर माझे वजन साधारणपणे ६५ किलो हवे. दोन महिन्यांपूर्वी कंपनीत शारीरिक परीक्षण होते. त्यावेळी माझे वजन ७२.५ किलो भरलेले. खर तर आनंद झालेला. कारण त्याआधी एक महिन्यांपूर्वी पर्यंत माझे वजन ७५ किलो होते. खरंच मी खुपंच ‘वजनदार’ झालेलो आहे. Continue reading “वजन”

अशोक'राव'

चित्रपटाची सुरवात एका अतिरेकी भीषण हल्याने होते. मुंबईत हल्ल्याने सारा देश हादरून जातो. राज्याच्या राजकारणात उलथापालथ होते. बेजबाबदार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला जातो. पक्षश्रेष्ठी नवा मुख्यमंत्री कोण करायचा याचा शोध घ्यायला सुरवात करतात. आणि नांदेडात त्यांना हवा तसा व्यक्ती भेटतो. मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यावर तो कामाला सुरवात करतो. पण पक्षातील आणि विरोधक त्याला नावे ठेवायला सुरवात करतात. मंत्रिमंडळाची बैठकीला सुरवात होते. सर्व मंत्री नवा मुख्यमंत्री किती फंटूश आहे यावर गप्पा मारायला सुरवात करतात. तेवढ्यात, मुख्यमंत्र्याचे आगमन होते. सर्वजण शांत होतात. Continue reading “अशोक'राव'”

राँग नंबर

काय बोलू अस झालं आहे. काय चालल आहे हे? आधी मैत्रिणीचे टेन्शन कमी होते की काय म्हणून आता तीच्या सिनिअरचे टेन्शन अजून आले आहे. यार ती तिची सिनिअर थोडीच ‘हेमंत’ आहे, की झुरत बसायला. मला तर आता, ती प्रपोज करील की काय अशी भीती वाटायला लागली आहे. तिचे वागणे एका आठवड्यापासून एकदमच बदलुन गेले आहे. सारखी माझ्याकडे पाहते. नुसती पहात नाही तर एकटक पाहते. साधे मी इकडून तिकडे जात असेल तर तिचे लक्ष माझ्याकडेच. काल दुपारी कॅन्टीनमध्ये तिला पाहून न पाहिल्यासारखे केल. तर ते पाहून तीचा एकदमच चेहरा उतरून गेला. नंतर मलाच खूप बेकार वाटलं. Continue reading “राँग नंबर”

का सतावते?

का सतावते आहे ती? चार दिवसांपासून हेच चालू आहे. तसं काल तिने मला दोन मेल पाठवले होते. पण पिंग करून गुड मोर्निंग केल तर, रीप्ल्याच दिला नाही. मी मुर्खासारखा दिवसभर तिने अस का केल म्हणून विचार करीत बसलो. आणि दुपारचा उपास तर आता रोजचाच झाला आहे. यार, रात्री जेवणाची इच्छा होत नाही. आणि सकाळी भूक असून त्या मिल्क शेकवर राहावे लागते. ती त्या जुन्या कॅन्टीनमध्ये जेवते. ती मस्तपैकी घरून डबा आणते. आणि ते जुन्या कॅन्टीनमध्ये ‘जेवण’ पाहून भूकच मारून टाकावी लागते. Continue reading “का सतावते?”

बंदी आणाच

काय चुकलं ‘बाबा’ आणि ‘मन्या सवारी’चे? संघावर बंदी असायलाच हवी. मी तर म्हणतो, अभिनव भारतवर सुद्धा बंदी असायला हवी. इंग्रजांच्या राज्यात तर होतीच. त्याचबरोबर शिवसेनेवर देखील बंदी आणा. दहशतवादी संघटना आहेत ह्या सर्व. शिवसेनेची तर दहशत तर अख्या महाराष्ट्रभर आहे. विश्व हिंदू परिषद वाले आणि बजरंग दलवाले सुद्धा काही कमी नाहीत. त्यांच्यावर सुद्धा बंदी आणायला हवी. म्हणजे आपला देश खर्या अर्थाने ‘धर्मनिरपेक्ष’ होईल. नाहीतर ह्या सगळ्या दहशतवादी संघटना देशाला पोखरून टाकतील. देशाचे किती मोठे नुकसान आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने त्यांच्यावर बंदी आणावी. आणि त्यासोबत सिमी आणि इंडियन मुजाहिदीन सारख्या खर्या अर्थाने ‘धर्मनिरपेक्ष’ संघटनांवरील बंदी उठवून अनुदान चालू करावे. त्यामुळे देशात होणारे हल्ले थांबतील. कस वाटत? Continue reading “बंदी आणाच”

फेडअप

खुपंच खजील झाल्याप्रमाणे वाटत आहे. काल देवाने इतकी चांगली संधी दिली. आणि मी ‘नेहमीप्रमाणे’ गाढवपणा केला. तिने काल स्वतःहून मला पिंग केलेलं. याआधी एकवीस सप्टेंबरला, म्हणजे मागील महिन्यात माझ्याशी मोकळेपणाने बोलली होती. त्यानंतर काल. आणि त्यावेळेसही माझ्यातील चुका समोर आलेल्या. आणि कालही. कालचा दिवस कसा गेला म्हणून सांगू. माझ्या फ्लोरवर जातांना कॅन्टीनमध्ये ती दिसली. तो लाल रंगाचा ड्रेस. देवाचे उपकार म्हणायचे तिचे लक्ष नव्हते. नाहीतर तीचा तो नेत्रकटाक्ष. ती तीच्या मित्राशी बोलत होती. तीच्या जवळून जातांना चक्कर आल्याप्रमाणे झाले होते. एकदा वाटले तिला तिथेच ‘हाय’ म्हणावे. पण ती समोर असतांना काय होते कुणास ठाऊक. काहीच करू शकत नाही. असो, डेस्कवर गेलो. Continue reading “फेडअप”

आज बोललो

झालं एकदाचं. आज मी तिच्याशी तीच्या त्या नव्या डेस्कवर जाऊन बोललो. सकाळी कंपनीत आल्यावर तीचा मेल पहिला. किती छान. आणि त्यात ‘टू’ मध्ये सुरवातीला मी. अगदी मस्त वाटायला लागले. मग हिम्मत करून तीच्या डेस्ककडे निघालो. पण कालप्रमाणे, तीच्या डेस्कजवळ जातांना पुनः हिम्मत गेली. मग तिथून त्या एपीएमच्या डेस्कवर गेलो. मुळात काहीच कारण नव्हते. पण तरीही विषय काढला. तिथून निघालो त्यावेळी काहीच सुचत नव्हते. पण केली हिम्मत. डेस्कजवळ जाऊन हाय म्हणण्यासाठी तोंड उघडले तर आवाजच निघेना. तसाच उभा राहिलो. तीच्या लक्षात आले त्यावेळी तिने हाय केले. मग ‘कंठ फुटला’. आज माझा ‘अवतार’ झालेला. Continue reading “आज बोललो”

ती येते आणि..

दुपारपर्यंत तिची आठवणीने हाल हाल केले. आणि दुपारी ती आल्यावर, त्यापेक्षाही हालाहाल. काळ्या रंगाचा ड्रेसमध्ये ती काय दिसते यार. दिसल्यावर अजूनच हालत खराब झाली. दुपारी कसबसे तीच्या डेस्कवर जायची हिम्मत करून निघालो. पण शेवटी व्हायचे तेच झाले. डेस्कजवळ गेल्यावर पुढे सरकायची हिम्मतच होईना. तीच्या बाजूच्या दुसऱ्या क्यूबमध्ये बसलेल्या माझ्या ओळखीच्या एपीएमच्या डेस्कवर जाऊन बोललो. नंतर खुपंच बेकार वाटायला लागले. साधे तीच्या डेस्कवर जाऊन मी बोलू शकत नाही. परवा ती माझ्या डेस्कजवळ आलेली. कदाचित माझ्याशी बोलायचे असेल. पण मी तिच्याकडे साधे मान वर करून पाहायची हिम्मत झाली नाही. काय होते यार, ती येते आणि मला घाम फुटतो. घसा, श्वास, हृदयनाथ सगळेच मला सोडून जावू लागतात. याला कसले प्रेम म्हणायचे यार? मी तिला भितो, हेच खरे आहे. Continue reading “ती येते आणि..”

अधांतरी

एक गुड न्यूज आहे. मी वन बीएचके बुक केला. फार मोठा नाही. पाचशे स्क़ेअर फुटाचा आहे. परवा वडील आलेले. त्यांनाही पसंत पडला. माझ्याच इमारतीत आहे. पुढच्या महिन्यात ताबा मिळेल. आता हा जो माझा आताचा वनरूम किचन आहे. हा विकून येईल त्या रकमेत दीड लाखाची भर टाकावी लागणार. आणि मुळात एक लाखाची रक्कम त्या बिल्डरला दिली आहे. आता अर्धा लाख उरले आहेत. थोडेफार जे बदल आणि काही गोष्टी घ्याव्या लागतील. पण काही हरकत नाही. होईल ते देखील. चला अर्धे काम झाले. आता ह्या कंपनीच्या पे रोल चा विषय राहिला. ते देखील होईल. त्याची इतकी चिंता नाही. Continue reading “अधांतरी”

राहू

बाबा राहू घरात पाऊल ठेवताच, मॉम खेकसते ‘ए कुठे घुसतो आहेस? हाकला रे! या भिकाऱ्याला’. बाबा राहू हसून’ हे काय मॉम? तू मला आजसुद्धा नाही ओळखलंस? माय नेम इज राहू गंदी’. मॉम गडबडून ‘हम्म, आली स्वारी. कुठले उकिरडे घोळले?’.  राहू ‘ बिहारात गेलो होतो’. वाक्य तोडत मॉम बोलली ‘किती घमेले उचलली?’ राहू ‘मॉम, मी कशाला घमेली उचलू? भाषणाला गेलो होतो’. मॉम उसासा टाकत ‘थांक ग्वाड! मग असा अवतार कसाकाय झाला? म्हणजे नक्कीच बिहारचा विकास झालेला नाही’. ‘नाही मॉम, बिहार खूप सुधारला आहे. महाराष्ट्राच्या पेक्षाही पुढे गेला आहे. दिल्लीच्या विमानतळावरून घरी येतांना जनपथवर उतरलो. टपरीवर चहा मारला. आणि घरात वळतोय, तेवढ्यात एक गाडी बाजूने गेली’ राहू बाबा बोलला. मॉम विचित्र चेहरा करून ‘मग तुझे कपडे चिखलाने कसे काय माखले? आणि फाटले देखील?’. Continue reading “राहू”