काहीही

खर तर आज वेगळ्या विषयावर बोलणार होतो. परंतु, एकदा मन मोकळ करावं म्हणतो. याआधीही मी बोललेलो. आणि आताही तेच बोलतो. मी काही फार मोठा लेखक, विचारवंत नाही. जे बोलतो ते जसेच्या तसे खरडतो. त्यामुळे माझ्या नोंदी ‘काहीही’, काहीतरीच असणार यात शंका नाही. आणि हे मला याआधीही मान्य होत. आणि आताही मान्य आहे. उगाच माझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा करणे चुकीचे आहे. मला माहिती आहे की, माझ्यामुळे अनेकांचा बहुमुल्य वेळ वाया जातो. Continue reading “काहीही”

हॅक

यार, माझ फेसबुकचे खाते आज पहाटे कोणीतरी हॅक केलेल. खर तर त्या ३१ डिसेंबरला मी माझे चिरकुटचे आणि हे फेसबुकचे खाते बंद केलेले. पण आज पहाटे तीन साडेतीनला कोणीतरी पुन्हा री-एक्टिवेट केलेल. कंपनीत येऊन पाहतो तर, फेसबुकचा ‘वेलकम बॅक’चा इमेल आलेला. यार, कोणत्या महान व्यक्तीने हे कृत्य केले कुणास ठाऊक. परंतु, त्यामुळे पुन्हा त्या फेसबुकवर यावे लागले. असो, हे म्हणजे असे झाले की, चोराच्या घरात चोरी. Continue reading “हॅक”

शतक

आजचा दिवस एकदम मस्त आहे. आज माझी बाईकचा वेग वाढला. वाढून ‘शतक’ ठोकले. गेले पंधरा दिवसात सर्वात जास्त वेग ताशी ऐंशी किमी. पहिले चार -पाच दिवस तर ताशी साठ किमीपेक्षा अधिक होतच नव्हती. माझ घर ते कंपनी बावीस किमी अंतर आहे. तस् हायवे जातो त्यामुळे एकूण अंतरात फक्त सात सिग्नल. त्यात पीसीएमसी मध्ये तीन आणि पुण्यात आल्यावर चार सिग्नल. मोजून पस्तीस मिनिटे लागतात. जाम मजा येते बाईक चालवतांना. तसे मी काही ‘धूम’ वगैरे नाही. माझा माझ्या मनावर आणि बाईकवर कंट्रोल असतो. एकटा असल्याने बाईकचा वेग वाढवायला काही चिंता नसते. Continue reading “शतक”

मुन्ना बदनाम हुआ..

संपादकांच्या परिषदेत मुन्ना आला. सर्वांना आपली ठरलेली ‘म्याऊ’ स्माईल देत सर्वांना अभिवादन केले. स्वतः खुर्चीवर बसल्यावर स्वतःच्याच हाताने स्वतःलाच चिमटा घेऊन पाहिले. सर्व संपादक अवाक होवून मुन्नाकडे पहात होते. मुन्नाने सर्वांकडे पुन्हा पाहून बसण्याची खुण केली. सर्व संपादक मंडळी खुर्चीत स्थानापन्न झाली. पहिला संपादकाने, ‘पंतप्रधानजी तुम्ही स्वतःचा चिमटा का काढला?’. प्रश्न ऐकताच मुन्नाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. Continue reading “मुन्ना बदनाम हुआ..”

मना

मी मनाला समजावतो. पण ते माझ ऐकून घेतच नाही. ‘निर्णय’ झाल्याचे मी त्याला सांगतो. पण.. ते माझ हे ऐकताच रुसून बसते. उदास होते. मी त्याला ‘चांदणी’ आयुष्य असल्याचे सांगतो. ते मला चंद्राची कोरीचा हट्ट करते. मी त्याला सांगतो, तो भूतकाळ. ज्यात फक्त अधीरता होती. ज्यात फक्त मी होतो आणि मीच. ते मला त्या सोनेरी क्षणांची आठवण करून देते. त्या सहवासाची, त्या अनमोल मोत्यांची. मी त्याला पुन्हा बोलतो. जाम झापतो. पण ते माझा निर्णय ऐकतच नाही. मला नाही नाही ते प्रश्न विचारून भंडावून सोडते. मला माझ्या शांततेची कारण विचारते. Continue reading “मना”

मला आई व्हायचंय

मी माझ्याबद्दल नाही बोलत आहे. मी चित्रपटबद्दल बोलत आहे. काल चिंचवडच्या बिग सिनेमाला चित्रपट पाहायला गेलेलो. चित्रपटाचे नाव ‘मला आई व्हायचंय’. नटरंग, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यांच्या इतका चांगला वगैरे नाही. परंतु, ‘श्वास’च्या टाईपमध्ये बसणारा आहे. पण एकूणच ठीक आहे. एका अमेरिकन स्त्रीला ‘आई’ व्हायचं असते. परंतु, बाळंतपणामुळे बेढबपणा येण्याच्या भीतीने ती सरोगसीचा मार्ग निवडते. सरोगेट म्हणजे पित्याचे शुक्राणू आणि मातेचे बीजाणू कृत्रिमरीत्या तिसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडून बाळंतपण केले जाते. थोडक्यात, ‘भाड्याची आई’. ती अमेरिकन स्त्री कोकणातील एका बाईची निवड करते. ती बाई म्हणजे या चित्रपटाची नायिका. Continue reading “मला आई व्हायचंय”

द बॉस

जगातील सर्वात भयानक प्राण्यांमध्ये ‘बॉस’ हा प्राणी गणला जातो. काही वैज्ञानिकांच्या मते, डायनासोरपेक्षाही हा भयानक प्राणी आहे. हा प्राणी कंपन्यामध्ये आढळतो. हा प्राणी जणू दिसायला सर्वसामान्य असला तरी फारच भीतीदायक असतो. हा प्राणी, साधारणतः केबिनमध्ये बसून कंपनी नावाचा रथ हाकत असतो. रथाला जुंपलेले घोडे, त्याच्या भाषेत ‘गाढवं’ तो रथ रक्ताचे पाणी करून ओढत असतात. परंतु नेहमी त्याला कामाचा घडा अर्धा रिकामाच दिसतो. Continue reading “द बॉस”

तो आणि ती

तो शांत. ती मस्तीखोर. तो कायम घरात असतो. आणि ती कायम घराबाहेर. तो खर्च वाचवणारा. आणि ती वेळ वाचवणारी. परंतु दोघेही कामसू. त्याला सॉफ्टवेअरचे वेड आणि तिला रस्त्यावरून फिरायचे. त्याला मैत्री करायला जमते. ती कोणाशीच जुळवून घेऊ शकत नाही. तो व्हर्चुअल जगात रमणारा. कल्पना करणे. आणि त्या कल्पना सत्यात उतरवण्याची किमया साकारणारा तो किमयागार. Continue reading “तो आणि ती”

हेल्मेट

गेले आठवडाभर उन्हात भाजून भाजून माझा चेहरा कोळशाप्रमाणे झालाय. शेवटी नाही हो करीत आज एक हेल्मेट खरेदी केले. फारच महाग आहेत हेल्मेट. पण चला ठीक आहे. ते हेल्मेट डोक्यात घातल्यावर मला ‘डोक् आहे’ याची जाणीव झाली. ते हेल्मेट राखाडी रंगाचे आहे. आज मी त्याच रंगाचा शर्ट घातलेला आहे. खर तर सगळच मॅचिंग मॅचिंग झाल आहे. हेल्मेट राखाडी, शर्ट राखाडी. मी माझे केस, पॅंट आणि बूट काळे. Continue reading “हेल्मेट”

क्षमता

मला नेहमी अस वाटत की, आपण आपल्या स्वतःकडे फार कमी लक्ष देतो. म्हणजे सचिनने ठोकलेली शतकांची संख्या, ओबामाचा दौरा किंवा आमीरने केलेल्या चित्रपटांची संख्या. परंतु आपण स्वतःला अस कधी पहातच नाही. आपल्याला पी टी उषाचा धावण्याचा वेग माहिती. परंतु आपला किती? हे नक्कीच आपण पहात नाही. दबंग मधील सलमानने कोणता ड्रेस घातला किंवा एखाद्या नटीने एखाद्या चित्रपटात किती किस दिले याची संख्या आपणाला माहिती असते.परंतु आपल्याकडे एकूण किती कपडे आहेत याची संख्या नक्कीच आपणाला माहित नसेल. Continue reading “क्षमता”