जय महाराष्ट्र!

जय महाराष्ट्र! आज मी या ब्लॉग मधील शेवटची नोंद ‘खरडतो’ आहे. मला समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. ब्लॉग ‘मी’ विषया भोवती फिरत होता. मुळात ‘मी’ हाच एक विषय होता. प्रत्येक वेळी ‘मी’ विषय माझ्याबद्दल होता. माझ्या प्रत्येक गोष्टी माझ्या पुरत्याच होत्या. थोडक्यात, एकटाच ‘ओनर’ होतो. परंतु, आता ‘भागीदारी’ झाली आहे. ‘मी’ चे पन्नास टक्के शेअर परवा मी एका व्यक्तीला दिले आहेत. त्यामुळे आता ‘मी’ माझा राहिलेलो नाही. थोडक्यात स्टेटस ‘सिंगल’चे ‘एंगेज्ड’ झाले आहे. त्यामुळे आता इथेच थांबणे योग्य राहील. Continue reading “जय महाराष्ट्र!”

यंदाच कर्तव्य आहे..

माझा ना आज काम करायचा बिलकुल मूड नाही. काय मस्त विकेंड गेला आहे म्हणून सांगू! असो, फार पिळत नाही. माझ्या लग्नाची तारीख फिक्स झाली आहे. वीस मे. गेल्या शनिवारी ‘बोलणी’चा कार्यक्रम होता. माझे आई वडील, मावशी, काका आणि आमचे बंधुराज हजर होते. ती, तिचे काका, मामा, आई वडील जवळपास सर्व नातेवाईक आलेले तिचे. मस्त एकदम. सुरवातीला साखरपुड्याची तारीख ठरलेली. म्हणजे १४ मे ला साखरपुडा आणि काहीतरी २ जूनच्या आसपास लग्नाची तारीख ठरवलेल. पण नातेवाईकांना डबल चक्कर होणार, म्हणून दोन्ही कार्यक्रम एकत्रच करूयात अस सगळ्यांच मत पडलं. मग २० मे ही तारीख सर्वांनुमते ठरली. Continue reading “यंदाच कर्तव्य आहे..”

औ भौ..

ठिकाण विधानसभा. वार बुधवार. मागील बाकावर बसलेला एक आमदार दुसऱ्या आमदाराच्या कानात कुजबुजत ‘औ भौ, कसला गोंधळ चालू आहे?’. दुसरा आमदार, जाड मिशा आणि ओठांचा चंबू करीत ‘आव जरा गप बसा, शाहेब अर्थसंकल्प वाचून दाखवत आहेत’. पहिला आमदार समजल्याची मुद्रा करून मान डोलवत शांत बसतो. न राहून थोड्या वेळाने ‘सत्यनारायणाची पूजा चालू हाये शहेबांची..’. दुसरा आमदार डोळे मोठे आणि तोंडावर बोट ठेवत शांत राहण्याची सूचना केली. विधानसभेच्या मध्यवर्ती भागात विरोधकांची ‘नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’ घोषणाबाजी सुरु असते. Continue reading “औ भौ..”

निवड

खर तर खूप गोंधळलो होतो. निवड कोणाची करावे हेच कळत नव्हते. पण, निर्णय घेतला आहे. खर तर मागील महिन्याच्या म्हणजे १३ फेब्रुवारीला मी माझा ‘होकार’ एका स्थळाला कळवला. आणि त्या मुलीनेही १४ फेब्रुवारीला तिचा होकार कळवला आहे. हाहा! काय बोलू यार मी? तिला माझ्याबद्दल काय माहिती आहे देव जाणे. आणि मी तर तिला एकच प्रश्न विचारलेला. नुसत्या तीस मिनिटांच्या बेसवर हा निर्णय घेतला आहे. Continue reading “निवड”

राजे

एक माणूस सिंहासारखा. एक राजा पहाडासारखा. त्याच आयुष्य म्हणजे एका स्वातंत्र्याची विजयगाथा. तो माणूस पण राष्ट्रासाठी देव. त्याचे मोठेपण, त्याची दूरदृष्टी. त्याच्या योजना. त्याची शून्यातून सर्वस्व उभे करण्याची ताकद. त्या महान व्यक्तीची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या एकूणच महान शौर्यगाथा भरलेल्या जीवनाचा आढावा माझ्यासारख्या कसपटाला प्राप्त होणे हे अनमोल भाग्य. Continue reading “राजे”

लाडोबा

तो ऑफिसात पाऊल टाकतो. आपल्या उरल्या सुरल्या केसांची ठेवण ठीक करीत, ‘ए’कारांत  शब्दांची उधळण सुरु करतो. डेस्कवर बसताच त्याला झालेल्या कामाची यादी हवी असते. पाणी प्यायचे असते, पण उठून घेण्याची ‘इच्छा’ नसते. आणि मग त्याचे ते डोळेरूपी घुबडांची भीरभीर सुरु होते. आणि त्या घुबडांना एखादे सावज दिसले. की तोंडाची लढाई सुरु. मग समोर कोणीही असो. ह्याला पाणी आणून देण्यासाठी आर्जव. का तर म्हणे घरी देखील हातात पाणी दिल्याशिवाय हा पीत नाही. जेवतांना देखील तसेच. म्हणजे डबा का आणत नाही? हा मला न सुटलेला प्रश्न. Continue reading “लाडोबा”

होलीकेला होळीच्या शुभेच्छा!!!

काय वर्णन करावे त्या होलीकेचे! समस्त देशावर जिचा पहिला हक्क आहे. अरे चुकले, जिचाच फक्त हक्क आहे. अशा आदरणीय, महान! होलीका यांना माझा हात, पाय, अजून काय असते साष्टांग दंडवत घालून होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तस् होळी तर गेल्या सात वर्षांपासून चालूच आहे. किती कृष्ण वैकुंठवासी झाले, हे त्या विधात्यालाच माहित. पण छान! असंच चालू द्या. Continue reading “होलीकेला होळीच्या शुभेच्छा!!!”

भेडीया

एका जंगलात एक भेडीया रहात असे. जंगलातील, सर्व प्राण्यांच्या बित्त ‘बातम्या’ तिला माहित असत. सिंह कोणाची शिकार करतो. ससे, हरणे परिवारातील कोणकोणत्या सदस्यांवर ससेमिरा चालू आहे. जंगलातील कुत्री कोणाकोणाकडून हप्ते गोळा करतात. अगदी, मुंगीचे कितवे बाळपण होते, इथपर्यंत सर्वांची माहिती. राजा सिंहाच्या गुप्तहेरांना देखील जी माहिती उपलब्ध नसे ती माहिती भेडीयाकडे असे. ती रोज सकाळी जंगलातील घडलेल्या महत्वाच्या बातम्या एका चौकोनी आणि उंच शिळेवर उभे राहून कथन करीत असे. आणि त्या महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी जंगलातील सर्व प्राणी रोज त्या शिळेस समोर गोळा होत असत. Continue reading “भेडीया”

भविष्य

प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पांडित्य भूषण हेमंत आठल्ये यांचा नमस्कार. गेल्या अनेक दिवसांपासून नित्यनियमाने ‘राशी आणि स्वभाव’ या नोंदीवर अनेक जण आपले भविष्य जाणून घेण्यासाठी आतुरलेले आहेत. म्हणून आज सोमवार फाल्गुन शुक्लं ९ शके १९३२ रोजीच्या शुभमुहूर्तावर बोलावं म्हणतो. ज्यांचा जन्म १९५० ते १९८५या काळात झालाय त्यांना बालपण उत्तम जाईल. तारुण्यात आणि म्हातारपणी त्यांना त्रास संभवतो. ज्यांचा जन्म १९८५ सालानंतर झाला आहे, त्यांना मनमोहन योगामुळे त्रास संभवतो. देशाचेही जवळपास असेच भविष्य आहे. Continue reading “भविष्य”

दूरदर्शन

माझ्या डेस्कसमोरील खिडकी नामक ‘टीव्हीतून’ अनेक वाहिन्यांचे दुरून दर्शन घेत असतो. कधीही पहा, एकानंतर एक कार्यक्रम अखंड चालूच असतात. ज्यावेळी मी कामातून उबतो. त्यावेळी त्या टीव्हीवरील ते दूरदर्शन पहाण्याचे सुरु करतो. अनेकदा दुपारच्या वेळी ‘घडलं बिघडलं’ चालू असते. म्हणजे कदाचित कावळ्यांच्या कॉलेजात काहीतरी आधीच घडले असते. आणि त्यावरून चार चौघे, म्हणजे काही कावळे आणि तितक्याच कावळिणी हसत खिदळत संवाद साधत असतात. कधीकधी त्यांची तिथेच मस्ती सुरु असते. Continue reading “दूरदर्शन”