माथेफिरू

हे सर्टीफिकेशन खुपंच कमी लोकांना मिळते. आणि हे टिकवणे त्याहून अवघड. कोणी संताने नमूद म्हटले आहे नां ‘जया अंगी माथेफिरूपण| तया यातना कठीण||’ खर आहे म्हणा. हे येरा गबाळ्याचे काम नोहे. दोनशे बळी घेऊन देखील कसाबला ‘आरोपी’ आणि ‘दहशतवादी’वरच समाधान मानावे लागले. कसाब काय आणि राजा काय. आणि राजू काय आरोपीच्याच सर्टीफिकेशन पर्यंत जाऊ शकतात. एवढेच काय नक्षलवादी देखील फार फार तर ‘दहशतवादी’ सर्टिफिकेट मिळवू शकतील. कारण, ‘माथेफिरू’ची परीक्षा तितकी अवघड आहे. ‘गुरु’जी सुद्धा संसदेत केलेल्या हल्ल्यानंतर जेमतेम ‘गुन्हेगार’ सर्टिफाईड होवू शकले. Continue reading “माथेफिरू”

क्षमा असावी.. महाराज

राजे आम्हाला क्षमा करा! खरच आमच चुकल. महाराज तुमचा २०२० मध्ये इतिहास कसा असेल? कसा बदलला जाईल. यावर हा बापडा बोलला. राजे आता काय बोलायचं? वर्तमान काय वर्णावा. आपले मावळे, आपल्याच मावळ्यांची उणीदुणी काढत बसले आहे. कुणा मावळ्याला वाटत माझीच जात ‘लय भारी’. आणि दुसऱ्याची जात ‘राक्षसाची’. बर राजे तुम्हीच सांगा. Continue reading “क्षमा असावी.. महाराज”

बेगरफिशर

कसला गहजब चाललाय? अस काय झालं की, ढग कोसळल्याप्रमाणे सगळीकडून आरडाओरड चालू झाली? आम्ही त्या बिचाऱ्या ‘बेगरफिशर’ला मदत करायची काय ठरवली की, सर्वच उठून बोलायला लागले. बघा कस आहे की, आधी सरकार काही करत नाही म्हणून ओरडायच.. आणि करतो म्हटलं की, तरीही टाहो फोडायचा. दुसरा काम धंदा नाही काय? तो गरीब ‘विजय ढोल्या’ आमच्या दरबारी शरण आला. शरण आलेल्याच रक्षण करणे हा आमचा धर्मच आहे. तसं आम्ही ‘निधर्मी’ आहोतच. Continue reading “बेगरफिशर”

का?

प्रत्येक वेळेस, प्रत्येक ठिकाणी तो ‘का?’ येतो. सकाळी उठून वर्तमानपत्र उघडतो. बातम्या वाचू लागताच तो ‘का?’ डोकावू लागतो. आवरून देवळात जातो. देवासमोर नतमस्तक होतो. थोड्याच वेळात दर्शनावरून मनात गोंधळ होतो. देवाच्या दर्शनाचा उद्येशाने आलेलो. पण दर्शन घेतले त्या ‘दानपेटीचे’. देवळात देवासमोरच दानपेटी ‘का?’ म्हणत ‘का?’ येतो. या विचाराने मन खजील होते. Continue reading “का?”