भ्रष्ट्रमेव जयते

हाईला! तू तू.. तुम्ही नाव पाहून गडबडला? नाही नाही.. ‘शो’च नाव नाही बदललं. तो कार्यक्रम असणार. रविवारी! होता है! होता है! आणि होणार. हा त्याच पद्धतीचा, पण थोडा, वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा. चिंता करू नका अरेs ‘आल ईझ हेल’. मला ओळखले ना? मी आपल्या सर्वांचा लाडका ‘गरीब खान’. या कार्यक्रमाचा होस्ट. या निर्दयी, निष्ठुर आणि शॉर्ट टर्म मेमरी लॉस जनतेच्या त्रासाने त्रासलेल्या नेत्यांच्या ‘मन’मध्ये काय चाललेलं. त्यांच्या ‘महान’ आणि ‘आदर्श’ कृत्यांच्या आढावा त्यांच्याच तोंडून. त्यांनी केलेल्या  विकासाच्या (स्वतःच्या) आणि त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी. मला खात्री आहे, हा माझा नवीन ‘शो’ तुम्हा सर्वांना नक्की आवडेल. चला, एका ब्रेकची वेळ झाली. Continue reading “भ्रष्ट्रमेव जयते”

चाकरी

‘चाकरी’ आणि ‘गुलामी’ हे दोन समानार्थी शब्द आहेत. आश्चर्य वाटेल! परंतु सत्य हेच आहे. पूर्वीच्या काळी धनाढ्य लोक त्यांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी ‘गुलाम’ खरेदी केले जात. खरेदी केलेला ‘गुलाम’ हा माणूसच असे. परंतु त्याने आपला ‘मालकाची’ सर्व कामे. त्याच्या इच्छेनुसार कराव्या लागे. मालकाची वर्तणूक कशीही असो. त्याने कितीही अत्याचार, अन्याय किंवा अपमान करो. ‘गुलाम’ माणसाला त्या सोसावेच लागे. मालक जे देईल (देईलच अशी शाश्वती नाही) ते खायचे. मालक म्हणेल तीच ‘पूर्व’. Continue reading “चाकरी”

कलाम का लांब?

काय बोलावं? सांगा आता कुणाला सांगाव? आता ‘अपेक्षा’ कुणाकडून करावी? ‘सोनिया’च्या सरकारने महागाईचा नांगर फिरवला. घोटाळे, करवाढ, भाववाढ!! त्यात आमच्या ‘ताई’ची प्रतिभा काय वर्णावी? स्वतःच्या पोराबाळांनापासून नातवंडांनापर्यंत सगळ्यांकडून ‘जगाचा भूगोलाचा’ अभ्यास गिरवून घेतला. परवाच्या निवडणुकीत पुत्ररत्न कोटींचा दानधर्म करतांना पोलिसांना ‘घावले’ म्हणे! काय महिमा म्हणावा घराण्याचा! कुमारी ‘मीरा’ आपल्या लाडक्या ‘कान्हाला’ शोधण्यात कोटी दस कोटी अर्पण केलेत. कुणास ठाऊक ‘कान्हाचे’ दर्शन घडले की नाही! आता याच्यापुढे कुणी किती आणि कसे उपकार केलेत याच वर्णन करू?? Continue reading “कलाम का लांब?”

परीक्षांचा निकाल

दर वर्षी फेब्रुवारी महिन्यानंतर ‘परीक्षांचा’ उन्हाळा सुरु होतो. या उन्हाळ्याच्या झळा जवळपास सर्वांनाच बसतात. छोट्या छोट्या बालांपासून ते त्यांच्या मोठ मोठ्या आई बाबांना. काहींच्या तर आजी आजोबांना देखील. जून महिन्यात मग सुरु होतो पावसाळा ‘परीक्षेच्या निकालांचा’. काहींचा पुरता ‘निकाल’ लागतो. काही हा पावसाळा आनंदाने साजरा करतात. परंतु, काही मात्र जाम ‘आजारी’ पडतात. Continue reading “परीक्षांचा निकाल”

व्यसन

विश्वातील बहुतांश लोकांना कोणते न कोणते व्यसन जडलेले असतेच. कदाचित आश्चर्य वाटेल! परंतु, खरे आहे. साधारणतः ज्या सवयीचा, मग ती कोणतेही असो, त्या सवयीचा अतिरेक झाला की त्याला ‘व्यसन’ असे संबोधतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी वाईटच असतो. Continue reading “व्यसन”