एक थी मांजर

एका जंगलात एक ‘वाघ’ रहात होता. तसे इतर अनेकही प्राणी राहायचे. वाघाच्या समोर कुणाचेही काही चालत नसायचे. काही प्रेमापोटी, तर काही भीतीपोटी त्याचे म्हणणे ऐकायचे. तसा वाघ खूपच प्रेमळ. जंगलातील प्राण्यांच्या, जंगलाच्या  भल्यासाठी तो कायम तत्पर असायचा. तसं म्हटलं तर जंगलात राज्य ‘गिधाडांचे’. त्यामुळे सर्वच प्राणी त्रासलेले. पण, वाघामुळे त्यांना आधार वाटायचा. वाघ जोपर्यंत आहे. तोपर्यंत कशाचीही काळजी नाही. कारण गिधाडांचा फडशा फक्त वाघोबाच पडू शकत होता. तो असला की, गिधाडे जंगलात सुद्धा फिरकत सुद्धा नसत. Continue reading “एक थी मांजर”

बाळासाहेब ठाकरे

काय बोलू! अगदी असह्य होतंय. अगदी ती, बाळासाहेबांच्या नसण्याची बातमी आल्यापासून ते आतापर्यंत सगळंच.. माहिती नाही का, पण त्या महान व्यक्तीच्या नसण्याच्या गोष्टीने अगदी असुरक्षित वाटत आहे. खर तर एक गोड बातमी तुम्हाला सांगणार होतो. पण हे अस घडलंय की..घराचाच आधारस्तंभ कोसळल्याप्रमाणे वेदना होत आहेत. त्या महामानवाबद्दल काय बोलावं, काय सांगाव. Continue reading “बाळासाहेब ठाकरे”