रामाने फळे आणली..

आजच्या मिडीयाला ‘रामाने फळे आणली’ या वाक्याची बातमी करायची झाल्यास…

सकाळ – अखेर रामाने फळे आणली.

महाराष्ट्र टाईम्स – रामाने फळे आणली?

लोकमत – नाईलाजास्तव रामाने फळे आणली.

सामना – रामाने फळे आणली. सर्वत्र जल्लोष.

पुढारी – रामाने फळे, फुले आणली.

टाईम्स ऑफ इंडिया – रामाने केवळ फळेच का आणली?

डी एन ए – रामाने फळेच आणली.

टाईम्स नाऊ – रामाने फळे कशासाठी आणली?

आज तक – ब्रेकिंग न्यूज : रामाने फळे आणली..

दूरदर्शन – राम आज फळे घेऊन आला.

आय बी एन लोकमत – रामाने टोपलीभर फळे आणली.

झी चोवीस तास – झी चोवीस तास इफेक्ट : रामाला फळे आणावीच लागली.

एन डी टीव्ही इंडिया  – राम फळे घेऊन परतला.

इंडिया टीव्ही – रामाने परत फळेच आणली..

आस्था – रामाने फळांची भेट आणली..

फिल्मी भक्ती

सकाळची थंडीची वेळ. डोळे उघडले. धुक्यातून अंधुकसे प्रकाशाची किरणे दिसू लागली. आणि अशा रम्य सकाळी बाजूच्या ‘साई’ मंदिरातून ‘काटा लगा’ संगीतावर ‘साईबाबाचे’ गाणे कानावर ‘आदळले’. झोपेत तर नाही ना म्हणून डोळे चोळून ऐकतो तर तेच. कान  साफ करून देखील तेच. पुढचे गाणे एकूण तर थक्कच झालो. Continue reading “फिल्मी भक्ती”

जोडधंदा

गेले काही दिवसांपासून विचार करतो आहे. किती दिवस असे दुसर्याच्या मळ्यात मजुरीची कामे करायची? दुसर्याची शेती कितीही कसली तरी, येणारे उत्पन्न त्याचे आणि मिळणारा मोबदला त्यामानाने पोटभर अन्न पुरवणारा. आणि समाधान नाही. त्यामुळे सोबत काहीतरी जोडधंदा करावा अस वाटते आहे. Continue reading “जोडधंदा”

वाघिणींनो

गेले काही दिवस जे चाललंय ते पाहून बोलल्या वाचून रहात नाही. कसली ती आंदोलने आणि कसल्या मेणबत्या! ही काय न्याय मागायची पद्धत आहे? हे म्हणजे अस झालं की आपल्या घरात सुरक्षित राहता यावं म्हणून घराबाहेरील व्यक्तीकडून अपेक्षा करणे. आपल्या पूर्वजांनी काय हे केलेलं. ती झाशीची राणी, ती काय इंग्रजांपुढे झाशीसाठी आंदोलने किंवा मेणबत्त्या लावत बसली? Continue reading “वाघिणींनो”

मुलगी झाली

एक गोड बातमी आहे. उशिरा सांगतोय, याबद्दल क्षमस्व! गेल्या महिन्यात, म्हणजेच नोव्हेंबरच्या दोन तारखेला दुपारी अडीचच्या सुमारास आमच्या घरी ‘कन्यारत्ना’चे आगमन झाले. बाळ आणि बाळाची आई दोघेही सुखरूप आहेत. बाळाचे दोन्ही आजी आजोबा जाम खुश आहेत. आणि बाळाचे बाबा बाळाच्या लीलात मग्न झाल्याने बोलायला उशीर झाला. Continue reading “मुलगी झाली”

आता तरी देवा आम्हाला..

हे क्रिकेटच्या देवा! हे मनोहरा, हे गोलंदाज निर्दालक, हे संकटमोचक! आम्हा तुझ्या भक्तांना तू खेळपट्टीवर उभा राहून, तुझ्या फळी नामक वज्राची तीक्ष्ण धारेने गोलंदाजांची व समोरील उभा ठाकलेल्या संघाची दाणादाण उडव. तुझ्या लयबद्ध आणि एखादया गायकाच्या आवाजाचा खोलावा जाणावा आणि त्याने श्रोत्यांचे मन तृप्त व्हावेत. त्याप्रमाणे तुझ्या फलंदाजीची मनमोहक फटकेबाजीने आम्हाला तृप्त कर. Continue reading “आता तरी देवा आम्हाला..”