वाद

जगाच्या पाठीवरील इतर दुसऱ्या कोणत्याच देशात इतके वाद होत नसतील. जितके आपल्या देशात होतात. कोणी काही बोलले तरी वाद. नाही बोलले तरी वाद. इतर काही घडो न घडो ‘वाद’ मात्र हमखास घडतात. निमित्त काहीही असते. वर्ष सुरु होवून कसाबसा महिना झाला तर, पंधरा-वीस वाद. आजकाल वादावरून गोष्टीची किंमत ठरते. Continue reading “वाद”

मन म्हणजे..

मन म्हणजे एक मोठे गूढ आहे. कधी काय करेल काही सांगता येत नाही. कुठल्याच गोष्टीला कशाचेच बंधन नाही. न कसली मर्यादा. ताब्यात राहणे हे मुळी माहितीच नाही. न वयोमर्यादा. जस वय वाढते, तसा याचा अल्लडपणा वाढत जातो. क्षणाक्षणाला बदलते. Continue reading “मन म्हणजे..”

मी स्वतः

एक पंचतंत्रातील गोष्ट आहे. एक अभ्यास पारंगत, विद्याभूषण नदीच्या कडेने चालले होते. तेवढ्यात त्यांना एका मुलाच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी वळून पहिले तर, एक मुलगा नदीच्या पाण्यात गटांगळ्या खात होता. त्या विभूतींना पाहून तो वाचवण्यासाठी विनंती करू लागला. त्यांनी त्याला पहिले आणि म्हणाले, ‘जर तुला पोहता येत नव्हते, तर मग तू पाण्यात गेलाच कशाला?’. त्या मुलाने चूक मान्य केली आणि पुन्हा वाचवण्यासाठी विनवणी करू लागला. परंतु हे महाशय त्याला उपदेशाचे डोसच पाजत बसले. Continue reading “मी स्वतः”

राष्ट्रीय प्राण्यांची ओळख २०१३

आपल्याला राष्ट्रीय पक्षी माहिती असेलच. आज आपण, राष्ट्रीय प्राण्यांची ओळख करून घेऊ. गेल्या वर्षीच्या एकूण आढावा घेऊन आज या राष्ट्रीय प्राण्याची निवड केलेली आहे. आता जसा चित्रपटात ‘ऑस्कर’ हा पुरस्कार मानला जातो. तसे देशातील तमाम प्राणी समुदायात, या ‘राष्ट्रीय प्राणी पुरस्कारा’ला आगळे वेगळेच महत्व आहे. Continue reading “राष्ट्रीय प्राण्यांची ओळख २०१३”

सेक्स

बस्स! नाव काढू नका. अगदी निषिद्ध विषय. ‘सेक्स’बद्दल बोलणे म्हणजे घाणेरडे. वाईट अगदी! लहान मुलांसमोर तर बिलकुलच नाही. असेच विचार येतात ना! माझ्याही मनात येतात. जसे पहाल तसे हे जग आहे. म्हटलं तर वाईट, म्हटलं तर चांगल. हा विषय ही तसाच. कदाचित, चर्चा देखील करणे ‘पाप’ वाटेल. Continue reading “सेक्स”

वेड असावे

प्रत्येक व्यक्तीला कोणत्याना कोणत्या गोष्टीचे वेड असते. म्हणजे, कंपनीत माझ्या बाजूला बसणारा माझा मित्र. त्याला क्रिकेटचे जाम वेड. कोणताही सामना चालू असो. हा त्याच्या अपडेट्स घेताच राहणार. एका बाजूला काम चालू आणि दुसऱ्या बाजूला  अपडेट्स. Continue reading “वेड असावे”

गाढवा…

त्याला बिग बॉस आवडत नाही,तिला बिग बॉस आवडतो.
दहा वाजून गेल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.
मी तुला आवडते पण बिग बॉस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.

Continue reading “गाढवा…”

जो तेरा है वो मेरा…

एक ‘हवेची शेपूट’ नावाची मोबाइल नेटवर्क सेवा पुरवणारी कंपनी आहे. तसं कंपनीचे महात्म्य अनेकांच्या तोंडून ऐकल्याने, मी कधी तिच्या वाटेने गेलो नव्हतो. आता घरच्यांच्या आग्रहास्त घेतलं शेपटीचे एक सिम. मग तिथून झाली या ‘करुण कहाणी’ची सुरवात. म्हणजे ती ‘शेपूट’ कधी कधी सापडायची. कोकणच्या वेड्यावाकड्या वळणात तर सोडाच पण हायवेच्या सरळ सपाट गुळगुळीत रस्त्यातही ती कधी मुळी मला सापडलीच नाही. Continue reading “जो तेरा है वो मेरा…”

एक छोटी बातमी डोंगरा एवढी..

रात्री एक भयानक घटना घडली. घडलेली घटना खर तर खूपच चीड आणणारी होती. कोणत्याही व्यक्तीच (राजकारणी सोडून) डोके फिरेल अशी होती. घडलेल्या घटनेने सारा देश हादरला. झालं! निमित्त सापडलं. ‘सबसे तेज..’ वाल्यांपासून ते ‘एक पाउल पुढे..’ पर्यंत सर्वांनीच त्या घटनेचे रुपांतर ‘टीआरपी’ मध्ये बांधण्याचा चंगच केला. Continue reading “एक छोटी बातमी डोंगरा एवढी..”