प्रश्न

प्रश्न हा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. प्रश्न निर्माण होतात. त्याच्या उकली सापडतांना जीवन वेगवेगळ्या अंगांनी बदलत जाते. बदल हा सृष्टीचा (न बदलणारा) नियम आहे. Continue reading “प्रश्न”

प्रश्न – राजा मनमोहनचे नाव बैल राजा कसे पडले?

उत्तर- इसवी सन २००४ पासून भारत नावाच्या देशामध्ये मनमोहन नावाचा राजा राज्य करीत होता. गुणी, सद्गुणी, हुशार असा आहे समज समस्त देशात पसरलेला होता. तो आला आणि देशाचे चित्रच पालटून गेले. दु:खी असलेले प्रजाजन अधिकच दु:खी होवू लागले. राजाच्या निर्णयाचा फटका सर्वच लोकांना बसू लागला. राजाच्या मंत्रिमंडळातील मंत्री रोजच खजिन्यावर धाडी टाकू लागले. शेजारील देश तर रोजच हल्ले करू लागले. Continue reading “प्रश्न – राजा मनमोहनचे नाव बैल राजा कसे पडले?”

भगवंताची उणीव

जीवनरूपी महासागरात, त्या भगवंताची उणीव का जाणवते? त्याचा अंश असलेल्या व्यक्ती पाहिल्यावर, त्याची ओढ अधिकच का जाणवू लागते. परीस्पर्श झालेला असतांना देखील ती ओढ अधिकच व्याकूळ करते. कर्तव्य की साधना याचीच गल्लत होते. धर्म कर्तव्य पालनाची आज्ञा देतो. आणि भक्ती भगवंताच्या साधनेची.

साधनेत भगवंत भेटीचा आनंद मिळतो. तरीही भगवंत भेटीची ओढ कायम राहते. हा जीव त्या भगवंतासाठी आसुसलेला आहे. कर्तव्याचे पालन करतांना नामस्मरण चालूच असते. भक्तीमध्ये लीन होवून या भवसागरातून तरून जाण्याचा खटाटोप.