ग्रामगीता – अध्याय पहिला १२

परि आम्ही वंचित दर्शनासि ।
परसुखें आनंद कुठला आम्हांसि?
आपुल्या स्वार्थे अल्पसंतोषी ।
मानतो स्वर्ग ॥१२॥
– संत तुकडोजी महाराज

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला १२”

ग्रामगीता – अध्याय पहिला ११

ज्यासि तुझें दर्शन घडलें ।
त्यास कैंचे परके राहिले? ।
सर्व विश्वचि झालें आपुलें ।
दिव्यपणीं ॥११॥
– संत तुकडोजी महाराज

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला ११”

ग्रामगीता – अध्याय पहिला १०

जेव्हां तुझे दर्शन घडे ।
उघडतीं विशाल ज्ञानाची कवडें ।
मग मी – तूं – पणाचे पोवाडे । कोठचे तेथे? ॥१०॥
– संत तुकडोजी महाराज

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला १०”

ग्रामगीता – अध्याय पहिला ९

तुझ्या शक्तीची ही पूर्णावलि ।
अजूनि नाही जीवाभावांत शिरली ।
म्हणोनीच अज्ञानदशा उरली ।
आम्हांपाशी ॥९॥
– संत तुकडोजी महाराज

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला ९”

ज्ञानाचे भांडार

हे आंतरजाल भलतंच अफाट आहे. इथे काय नाही! जितकी माहिती हवी तितकी उपलब्ध आहे. फक्त विचार करण्याची गरज आहे. गुगल महाराज आपल्या समोर हजारो लेख/तत्सबंधी माहिती आपल्या समोर एका चुटकी सरशी दाखवते. माहितीच्या आधारे अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात. अनेक नवनवीन गोष्टी त्यामुळे आपल्याला माहिती होऊ शकतात. मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे त्यामुळे सुटू शकतात. त्यातील काही महाकाय भंडारी माहिती आपल्याला थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो आहे! Continue reading “ज्ञानाचे भांडार”

ग्रामगीता – अध्याय पहिला ८

त्यासि नाही उरला भ्रम ।
विश्व आपणासह झाले ब्रह्म ।
तो जे जे करील तें तें कर्म ।
पूजाच तुझी ईश्वरा ! ॥८॥
– संत तुकडोजी महाराज

अर्थ: त्याच्या सर्व भ्रामक गोष्टी पूर्णपणे संपुष्टात आल्या म्हणून संपूर्ण विश्व आणि त्याच्या बरोबर ब्रह्म म्हणून त्याला दिसते. त्यामुळे त्याच्या सर्व कृत्यांनी तुमची पूजा करण्याचा प्रकार बनला.

ग्रामगीता – अध्याय पहिला ७

हें जयाचिया अनुभवा आलें ।
त्याचे जन्ममरणदुःख संपले ।
आत्मस्वरूप मूळचें भलें ।
ओळखलें म्हणोनिया ॥७॥
– संत तुकडोजी महाराज

अर्थ: जेव्हा स्वतःला मूळ स्वरूप समजले आणि अनुभवले त्याच्या जन्माच्या आणि मृत्यूच्या दु:खं संपले!

प्रशिक्षणार्थी इंजिनीअर्ससाठी संधी

टीएचडीसी इंडिया लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी इंजिनीअर्ससाठी संधी-

अर्जदारांनी सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल इंजिनीअिरगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी गेट- २०१८ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली टीएचडीसी इंडिया लिमिटेडची जाहिरात पाहावी अथवा कंपनीच्या  http://www.thdc.co.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१७.

असिस्टंट सिस्टीम अ‍ॅनलिस्ट कम सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून संधी

इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च मुंबई येथे असिस्टंट सिस्टीम अ‍ॅनलिस्ट कम सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हल्पमेंट रिसर्च मुंबईची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या  http://www.igidr.ac.in/careers/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१७.

मॅनेजर- पब्लिक रिलेशन्स म्हणून संधी

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मध्ये मॅनेजर- पब्लिक रिलेशन्स म्हणून संधी-

वयोमर्यादा ४२ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मुंबईची जाहिरात पाहावी अथवा माझगाव डॉकच्या www.mazdock.com या संकेतस्थळावरील career>executives या लिंकवर जाऊन माहिती घ्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ डिसेंबर २०१७