ग्रामगीता – अध्याय पहिला १३

दुसर्‍याची उणीव पाहतां हसणें ।
दुसर्‍याची आपत्ति पाहून पळणें ।
दुसर्‍याचें वैभव देखोनि जळणें ।
होतें ऐसें ॥१३॥

– संत तुकडोजी महाराज

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला १३”

निष्पाप सलमान

खरंच किती अन्याय ह्या निष्पाप सलमानवर! न्यायसंस्था खंबीर आहे म्हणून बरं, नाहीतर ह्या क्रूर लोकांनी दयावान व भारताचा ब्लॅक डायमंड व आमच्या लाडक्या सलमानला त्रासून मारले असते. नाही मला तुम्ही सांगाच आता! फुटपाथवर गाडी घातली मग काय असं मोठं केलं. मान्य आहे आमच्या भाईने दारू ढोसलेली. बरं गाडी खाली कशाला यायचं लोकांनी? चूक त्या गरिबांची आहे. उलट आमच्या भाईनीं देश हिताचेच काम केलं. आता फुटपाथवर झोपायला काय बसायलाही लोक घाबरतात. आणि कुणी बसलेच तर झोपेतही सलमाची स्वप्न पडतात. देशकार्य केलं म्हणून पुरस्कार द्यायचा सोडून केस टाकली? Continue reading “निष्पाप सलमान”

भाषा

थोड्यावेळापूर्वीच सोसायटीतील एका सभासदाच्या भावाचा फोन आलेला. प्रसंग अगदी सोपा! सोसायटीच्या भिंतींवर दोन दिवसापूर्वी परस्पर दोन तीन ठिकाणी स्वतःची सदनिका विकण्याची जाहिरातीचे पत्रक लावलेली. माझ्या सांगण्यावरून सुरक्षारक्षकाने ती काढलेली. अपेक्षेप्रमाणे साहेबांचा फोन आलेला. मी देहूरोड इथे राहतो. मला न विचारता आपण ती पत्रके कशाला काढलीत वगैरे वगैरे (खरं तर संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने मी विचारायला हवं होत!). मला खरं तर हसावं की रडावं तेच समजेना. साहेबांना ‘सेक्रेटरीशी बोला’ असं म्हणून मी फोन कट केला. Continue reading “भाषा”

कायदा आणि आपण

खरं तर कायद्याविषयी काही बोलावं असं मनात नव्हतं. परंतु गेल्या काही काळापासून हे वातावरण या देशात आहे ते पाहता बोलणं भाग आहे. देशाला पुढे जायचं असेल तर तशी इच्छा आधी इथल्या लोकांमध्ये असणे जरुरी आहे. मी रोज घरापासून माझ्या कचेरीत येण्याच्या रस्त्यांमध्ये चौकाचौकात असलेल्या सिग्नल तोडणाऱ्यांचे प्रमाण पाहतो. घरी जातांना फुटपाथला लागून असलेल्या रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या दुचाकी आणि चारचाकी उभ्या गाड्या पाहतो. हातगाड्या आणि फेरीवाल्यांना पाहतो. पैशाशिवाय सरकारी काम होणार नाही अशी धारणा असलेल्या माझ्या सोसायटीतील सभासदांना पाहतो. रस्त्याच्या कडेला असलेला कचरा पाहतो. कचरा टाकणाऱ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पाहतो. मग मनात प्रश्न उभा राहतो की खरंच आपल्या लोकांची मानसिकता नेमकी काय आहे? Continue reading “कायदा आणि आपण”

आधारकार्डला माझा विरोध कशासाठी?

काही बोलण्याआधी काही स्पष्ट करावेसे वाटते. आधारकार्ड एक चांगली योजना आहे. परंतु ज्या प्रकारे तिचा आवाका वाढवला त्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना अशी योजना असावी ही त्यावेळचे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी चाचपणी झाली. त्यानंतर आलेल्या मनमोहन सिंह यांच्या काळात याला मूर्त स्वरूप आले. रेशन व अन्य काही गोष्टीपुरता याचा आवाका होता. २००९ साली निलेकेणी या इन्फोसिस संस्थापकांचा मार्गदर्शनाखाली एक कंपनी सुरु करण्यात आली. मला युआयडीएआयच्या इतिहासात जायचं नाही. थोडक्यात, सरकारने एका भागीदार झाले. मग काय नियम असतील. कायदा कसा असेल यातही निलेकेणी यांच्या सौ. कंपनीने सरकारला सल्ले दिले! Continue reading “आधारकार्डला माझा विरोध कशासाठी?”