हे आंतरजाल भलतंच अफाट आहे. इथे काय नाही! जितकी माहिती हवी तितकी उपलब्ध आहे. फक्त विचार करण्याची गरज आहे. गुगल महाराज आपल्या समोर हजारो लेख/तत्सबंधी माहिती आपल्या समोर एका चुटकी सरशी दाखवते. माहितीच्या आधारे अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात. अनेक नवनवीन गोष्टी त्यामुळे आपल्याला माहिती होऊ शकतात. मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे त्यामुळे सुटू शकतात. त्यातील काही महाकाय भंडारी माहिती आपल्याला थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो आहे!
गुगल असो! याहू असो अथवा बिंग! सर्वांनी माहितीचा खजिना आपल्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. जितके शोधलं तितके सापडेल! लाखो विषय, कोट्यवधी वेबसाईट आणि अब्जावधी माहितीचे लेख! विज्ञानाची भन्नाट माहितीपासून ते शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती! हवं ते मिळेल अशी परिस्थिती आहे. लवकरच अशा माहिती देणाऱ्या वेबसाईटबद्दल एक सदर सुरु करतोय!
आपल्याला आवडेल अशी अपेक्षा करतो!
December 26, 2017
एक छान उपक्रम…शुभेच्छा
December 27, 2017
धन्यवाद! 🙂