काय महत्वाचे?

आपण कुठे चाललो आहोत ह्याच भान राहिलेलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फालतू नगरसेवकाच्या पोटनिवडणुकीत मुर्दे पाडले जातात. गुन्हेगार चक्क राज्यातील आमदार! गुन्हेगारांना पोलीस चौक्यातून सहीसलामत सुटका करणारे देखील राज्याचे आमदार! पाणी पडल्याच्या कारणावरून खून आणि अनधिकृत नळजोडणी मनपाने तोडली म्हणून दंगल केली जाते.

बिहारला हेवा वाटावा असे एक ना अनेक प्रकार घडत आहेत. चिमुरड्यांवर अत्याचार घरातीलच मंडळी करतात. अगदी काही ठिकाणी बाप देखील बलात्कार करतो. महाराष्ट्रात अनधिकृतरित्या शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणात सापडतो. काय चाललंय! राजकीय तर आनंदी आनंद आहे. पण हे काय? महाराष्ट्राचा बिहार झालाय! कचऱ्याचा खच महाराष्ट्रभर पसरलाय. त्यावर कुणाला काही वाटत नाही. सार्वजनिक स्वच्छता गृहे कायम अस्वच्छ! आजकाल जात ही अभिमानाची व दुसऱ्याला खिजवण्याची गोष्ट बनली आहे.

साधू संतांची भूमी, शिवरायांपासून ते टिळक आणि आंबेडकरांपर्यंत सर्वांनी ह्या भूमीसाठी आपले आयुष्य वेचले तिथं आज आम्ही आमच्याच लोकांना संपवण्याच्या गोष्टी करतो. सात कोटी मराठी भाषिकांवर व महाराष्ट्रावर पाच कोटी अमराठी लोक येऊन राज्य करण्याची स्वप्न पाहतात. इथली भाषा नाकारतात. इथं अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी गुरगुरतात. नवी मुंबईच्या आयुक्तावर हात उचण्यापर्यंत मजल जाते. हे राज्य आपले आहे! ही भूमी आपली आहे. ह्या राज्यासाठी १०७ हुतात्म्यांनी आहुती दिली. हे सगळं कशासाठी केलं? ह्या अशा महाराष्ट्रासाठी? विचार करूया आणि ह्या राज्याला बिमारू राज्यांच्या यादीत जाण्यापासून वाचवुयात!

मी एक वेब डिझायनर आहे. वेबसाईट डिझायनिंगची कामे करतो. पुण्यात वास्तव्य!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to top