ब्लॉग

भेदभावाचे अर्थकारण

भारत माझा देश आहे व सर्व भारतीय माझे बांधव आहे हा शुद्ध गैरसमज वाटावा अशा गोष्टी घडत आहेत. जेव्हा व्हिडीओकॉनचे धूत नियमाप्रमाणे कर्ज काढतात आणि त्याचे हप्ते देखील वेळेवर भरतात. तरीही इन्कम टॅक्स विभाग त्यांना समन्स पाठवतो व चौकशीला बोलावतो! पन्नास कोटीसाठी डीएसकेनां कारागृहात जावे लागते. त्याउलट नऊ हजार कोटींचे कर्ज फेडू न शकलेल्या अनिल अंबानींना ना कारागृहात जावे लागते न इन्कम टॅक्सकडून साधे पत्र जाते. ह्याला भेदभाव नाही तर काय म्हणायचे?

देशाची आर्थिक स्थिती बिघडलेली असतांना माझा तुझा करण्यात काय अर्थ आहे. आताची परिस्थिती दिवाळखोरीला निमंत्रण देणारी आहे. सर्वच्या सर्व ११ राष्ट्रीयकृत बँका धोक्यात आल्या आहेत. एनपीए १५०% वाढला आहे. बरं गुन्हेगारांना कशाचीच भीती नाही. परराष्ट्र मंत्रालय सीबीआयची चौकशी चालू असतांना विजय मल्ल्याला जाऊ देण्यासाठी हालचाल करते. निरव मोदी, ललित मोदी, चोक्सी हे पळून गेल्यावर आमचे सरकार हालचाल करते. हे सगळं भेदभावाचे द्योतक आहे. कनिमोळी, डी.राजा आणि भुजबळ आर्थिक हेराफेरीमध्ये कारागृहात जातात.

तर दुसरीकडे गुजराती घोटाळेबाज आरामात देश सोडून पलायन करतात. हा देश एक आहे तर सर्वांवर समान कारवाई का होत नाही? ह्याला काय देशभक्ती म्हणायची? हा शुद्ध देशद्रोह आहे. देशाचे पैसे बुडवणारा व त्याला साथ देणारा प्रत्येक गुन्हेगार आहेच. पण सोबत तो देशद्रोही आहे! हा पैसा जनतेचा आहे. ह्या देशाचा आहे! गेल्या पाच वर्षात २१ लाख कोटी देशाबाहेर गेले आहेत. व ते परत आणण्याच्या हालचाली नाहीच्या बरोबर आहेत!

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.