उखाणे

उखाणे

आज संध्याकाळी माझ्या एका जीवालग मित्राला ‘तू आजकाल भेटत का नाहीस?’ अस विचारल्यावर तो खोचकपणे ‘मी आजकाल सिंहगड, सारस बागेत जास्तवेळ असतो म्हणून’ उत्तर दिले. आता काही महिन्यापूर्वी म्हणजे मी घर विकत घेतल्यावर तो ‘लग्न कधी करतो आहेस?’ अस विचारायला सुरवात केली. सुरवातीला हसून टाळले. पण तो कधीही कुठेही भेटला की हाच प्रश्न. मग शेवटी त्याचा माझ्या लग्नाचा विषय बंद करण्यासाठी मी त्याला नेटवरून एका मुलीचा फोटो दाखवला आणि त्याला म्हटलं की ‘ह्या मुलीशी माझ लग्न ठरलं आहे’. आता ती मुलगी कुठल्याही चित्रपटातील किंवा मालिकेतील नटी नसल्याने त्याला माझी थाप पचली. मग कधीही माझ्याशी लग्नाचा विषय काढला की मी तिचा विषय काढायचो.

मागील महिन्यात त्याने माझ्या लग्नाचा विषय बंद केला. आणि आज त्याला विचारल्यावर मलाही त्याच पद्धतीने उत्तरे द्यायला लागला. त्याला मी विचारलं की मुलगी कोण आहे. तर साहेब म्हणाले ‘नाव कस घेऊ?’. मग पुढे खूपच आढेवेढे घ्यायला लागला. त्याला म्हटले ‘तोंडाने घे, नाही तर उखाणा घे’. पण तो काही नाव घेईना. शेवटी काय कराव म्हणून मी नेटवरून एक भन्नाट साईट शोधली. मराठी उखाण्यांची. मग काय सुरु

आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
**चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा

तरीही काही नाव सांगेना मग

चान्दिच्या ताटात फणसाचे गरे
**राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे

मग तर तो जाम वैतागला. निघूनच गेला. असो, पण उखाणे बाकी जोमदार होते. त्यातील अजून काही मजेदार उखाणे वाचले.

कपावर कप कपाखालि बशि
माझी बायको उवर्शी बाकी सगळ्या म्ह्शी

पाव शेर रवा पाव शेर खवा
** चे नाव घेते हजार रुपये थेवा.

भातुकलीचा खेल मांडला चुल आणि बोळक्यात
**च नाव घेतो मुर्खांच्या किंवा मित्रांच्या घोळक्यात

असो शेवटी मित्र परत आला पण त्याने काही परत तो विषय काढला नाही. आता या नोंदीचा शेवट देखील उखाण्यानेच करतो. नाही तर तुम्ही देखील माझ्या लग्नाचा विषय सुरु कराल.

चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ

अरे विसरलोच, साईटचे नाव आहे उखाणे.को.इन

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.