नोंद

मुली आणि मोबाईल

या ‘मुली आणि मोबाईल’ म्हणजे ‘दो जिस्म एक जान’ आहेत. कुठेही बघा, या कायम त्या ‘मोबाईल’वरच. सकाळी कंपनीची लेट मोर्निंगची बस चुकली. पीएमपीएल च्या डब्यात बसलो. डांगे चौकात बस थांबली. झालं! तो बस चालक गळा फाडून पुढच्या दारातून चढू नका म्हणून ओरडत होता. पण ऐकतील तर मुली कसल्या? माझ्या समोर एक आणि बाजूला दोन अशा मुली उभ्या. यार ह्या मुली एवढ्या सुंदर का असतात? बस निघून दोन एक मिनिटे नाही होत तेवढ्यात समोरच्या मुलीच ते ‘कार्ट’ किंचाळल.

झालं! बाई साहेबांनी बघितला तर मेसेज. मग त्याची दोन एक बटन दाबल्यावर बाई साहेबांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य. ताबडतोप बाईसाहेब काही तरी खरडत बसल्या. बहुतेक रिप्लाय केला. पुन्हा एका मिनिटाच्या आत परत ते कार्ट किंचाळल. मग पुन्हा स्मितहास्य. आणि खरडण चालू. असा प्रकार अर्धा तास चालू होता. बाजूची तर आल्यापासून फोनवरच होती. किती हळू आवाजात फोनवर बोलतात या मुली! माझ्या एवढ्या जवळ उभी होती. पण नुसतीच ओठांची हालचाल दिसायची. आवाज येतच नव्हता. असो, पुण्याच्या मुलींचा हा एक ‘गुण’ आहे. माझी मैत्रीण देखील अशीच आहे. तिचा तर दिवसातील असा एकही तास नसेल की ज्या तासात तिला एक तरी फोन आला नसेल. मध्यंतरीची गोष्ट, आम्ही दोघे माझ्या लहान बहिणीच्या वाढदिवसासाठी काही तरी गिफ्ट घ्याव म्हणून गेलेलो.

एका सोनाराच्या दुकानात लहान बहिणीसाठी दागिने घेतले. आणि पैसे देण्यासाठी मी माझे डेबिट कार्ड त्या दुकान मालकाला दिले. तर त्याच्याकडे ते स्व्याप होईना. म्हणून मी तिला, मी बाजूच्या एटीएम मधून पैसे काढतो म्हणून सांगायला लागलो तेवढ्यात तिला तिच्या ‘मित्राचा’ फोन आला. तिने मला नुसतीच मान डोलावून होकार दिला. एटीएम ला नेहमी प्रमाणे गर्दी. पैसे काढायला बराच वेळ गेला. दुकानात पुन्हा आलो तेव्हाही तिचा फोन चालूच. मग तिथून आम्ही माझ्या कपड्यांच्या खरेदीसाठी बाजूच्या बिग बझार मध्ये गेलो. तिथेही तिचा फोन चालूच. असो! अस अर्धा पाउण तास फोनवर असल्यावर सोबताच्याला बेकार वाटणार नाही का? वाढदिवसा निमित्ताने मी लहान बहिणीला भेटायला गेलो होतो. तिथेही असेच. हिने प्रसाद वाटावा असा हिचा घराचा नंबर सगळ्यांना देवून ठेवला आहे. मग एसेमेस चालूच.

कंपनीच्या बस मध्ये ह्या मुली बसल्या की, तो फोन चालूच झाला समजा. मध्यंतरी असाच एकदा मित्रासोबत कंपनीतून घरी येत असतांना एका चौकात एक मुलगी चक्क माझ्याकडे बघून हसत होती. दोन एक मिनिटांसाठी तर मला भोवळ आल्याप्रमाणेच झाले. थोड्यावेळ नीट निरीक्षण केल्यावर तिच्या कानात हेडफोन असलेले बघितले. मग काय तो सगळा प्रकार लक्षात आला. अनेक वेळा तर बाईकवर एका सोबत आणि फोनवर दुसर्या सोबत अस मी बघितलं आहे. कंपनीतील ललनांबद्दल काही बोलायलाच नको. त्या एकतर फोनवर असतात किंवा जी टाल्कवर. मी तर म्हणतो, सरकारने मुलींना मोफत शिक्षणाबरोबर मोफत मोबाईल आणि फ्री सर्व्हिस देखील द्यायला हवी. म्हणजे त्यांना मनसोक्त बोलता येईल. बर काहीच नाही म्हणालं तर यांची गाणी ऐकणे सुरूच असते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.