नोंद

मोदी भक्तांची लक्षणे

मोदी भक्त कोण हे ओळखणे अतिशय सोपे व साधे आहे! भक्तांचे पहिले लक्षण! ते ‘अति सकारात्मक’ असतात. मग नोटबंदी असो वा अन्य कोणतेही प्रश्न! त्यांच्याकडे प्रत्येकाचे उत्तर असते! आणि तुम्ही जोपर्यंत निरुत्तर होणार नाही तोपर्यंत हे स्वतःचा वेळ खर्च करून तुमचे मत बदलण्यासाठी ते प्रयत्न करतात.

भक्तांचे दुसरे लक्षण! ते मोदी एखादी गोष्ट ‘करणार’ असे म्हटल्यास त्याचा अर्थ ‘झाले’ असा घेतात. मध्यंतरी पठाणकोटावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला चढवला! देशभरातून टीकेची झोड उठली. पाकिस्तानवर हल्ल्याची मागणी जोर धरू लागली तर त्याच्या बदल्यात आमच्या पंतप्रधानांनी आपल्या आवेशपूर्ण भाषणाने त्यांना उत्तर दिले! झाले सगळा संप्रदाय नाचू लागला. खरं तर त्यांच्या विरोधात सैनिकी कारवाई होणे अपेक्षित होते. पण भक्त संप्रदाय पाकिस्तान कसा घाबरलाय वगैरे सांगून मोदीजींचे कौतुक करू लागला!

तिसरे लक्षण! कितीही कठीण परिस्थिती असो! अगदी मोदींचा निर्णय चुकला तरी त्यातून भलताच अर्थ काढून त्याचे ‘समर्थन’ करत बसतात. नोटबंदी झाली! जनता त्रस्त झाली. पण भक्त आनंदी आनंद घडे करत बसले होते! आता काश्मीरमधील दगडफेक संपणार! एका दिवसात अतिरेकी संपले. काळेधन असलेले संपले असे म्हणत ते आनंदुन गेले. वास्तवात अनेक उद्योगधंदे बंद पडले. दीड एक लाख बेरोजगार झाले! अगदी तीन आकडी जीव गेले! ९७% जुन्या नोटा जमा झाल्यावर सरकार गरबडले! पण भक्त ऐकतील तर शपथ! त्यांनी ‘डिजिटल इंडिया’, ‘कॅशलेस इंडिया’साठी केलं असं म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतली!

तर असे असतात भक्त! उद्या जाऊन मोदींनी साधे शिंकले तरी हे किती छान! म्हणून ह्यावर चार दिवस चर्चा करतील! एका अर्थाने लोकांना महागाईच्या काळात तेवढाच बिन पैशाचा तमाशा बघायला मिळतो हेच काय ते आनंदाची बाब!

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.