नोंद, मी, विचार

सुधारणा

स्वतःमध्ये सुधारणा करणे म्हणजेच प्रगती करणे. अनेकदा आपण अनेक गोष्टी ठरवतो. त्यासाठी प्रयत्न करतो. कधी त्या यशस्वी होतात तर कधी अयशस्वी तर कधी त्या गोष्टी करणेच राहून जाते! असे होते कारण आपल्याला एकतर त्या गोष्टी करायच्या नसतात. किंवा आपल्याला त्यात फारसे काही जमत नसते.

प्रत्येकात काही ना काही कला ही असतेच! आपल्या लक्षात येण्याची केवळ गरज असते. त्या विषयात आपण मनापासून काम करतो. व ती गोष्ट आपल्याला चांगली जमते. कधीकधी काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात पण त्या आपल्याला हव्या तशा आपल्याला जमत नसतात. आपण प्रयत्न करतो परंतु तो अयशस्वी होतो. असे का घडते?

कधी कधी तर आपण यशस्वी देखील होतो. पुढे जाऊन आपण त्या क्षेत्रात पाऊल टाकतो. त्यात आपल्याला यश देखील मिळते. परंतु काळानंतर त्या क्षेत्रात नवीन गोष्टी येतात. मग तिथं आपली पंचाईत होते. आपल्याला मिळणारे यश कमी होऊन अडचणीत वाढ होते. या सर्वांचे एकमेव कारण म्हणजे आपण जे काम करतो अथवा जी गोष्ट करतो यात आपण सुधारणेला वाव देणे टाळतो! अनेकदा यशाच्या आनंदात आपण इतके हरवून जातो की आपल्या लक्षात येत नाही की त्यात बदल घडत आहेत. पुढे जाऊन आपण त्या क्षेत्रात मागे पडतो.

यासाठी सातत्याने आपण ज्या गोष्टीत अथवा ज्या क्षेत्रात काम करतो त्यात नावीन्य व सुधारणा काय करता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा आपण यशाच्या आनंदात मागे पडू! सुधारणे हेच जिवंत असल्याचे लक्षण आहे. आणि तो आपल्या कामाचा भाग असायला हवा! जीवनात कायम यशस्वी राहायचे असेल तर आपण आहे त्याहून अधिक चांगले कसे करू शकतो याचा ध्यास घेणे गरजेचे आहे!

4 thoughts on “सुधारणा

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.