ग्रामगीता – अध्याय पहिला १५

हें जेव्हां अनुभवा आलें ।
तेव्हाच ’ अल्पज्ञ आम्ही ’ कळलें ।
म्हणोनि तुझ्या नामी वेधलें ।
चित्त सर्वतोपरी ॥१५॥

– संत तुकडोजी महाराज

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला १५”

ग्रामगीता – अध्याय पहिला १४

कष्टासाठी कोणी मरो ।
प्रतिष्ठेसाठी आम्हीच उरों ।
लोभासाठी कुणाहि स्मरों ।
होतें ऐसें ॥१४॥

– संत तुकडोजी महाराज

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला १४”

दिनक्रम

दिनक्रम ही अशी गोष्ट आहे की जी जीवन बदलून टाकते. काहीवेळा आयुष्य देखील उलथवून टाकू शकते. दिनक्रम खरं तर पाळणे खूपच अवघड गोष्ट आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून माझ्याकडून पाळला जातो आहे. खरं तर काही दिवसांपूर्वीपर्यंत मी जी गोष्ट ठरवायचो ती ठरल्याप्रमाणे होणार नाही अशीच परिस्थिती होती. पण आता बऱ्यापैकी त्यावर मात केली आहे. Continue reading “दिनक्रम”

मोदी भक्तांची लक्षणे

भक्त कोण हे ओळखणे अतिशय सोपे व साधे आहे! भक्तांचे पहिले लक्षण! ते ‘अति सकारात्मक’ असतात. मग नोटबंदी असो वा अन्य कोणतेही प्रश्न! त्यांच्याकडे प्रत्येकाचे उत्तर असते! आणि तुम्ही जोपर्यंत निरुत्तर होणार नाही तोपर्यंत हे स्वतःचा वेळ खर्च करून तुमचे मत बदलण्यासाठी ते प्रयत्न करतात. Continue reading “मोदी भक्तांची लक्षणे”

कोणता व्यवसाय करू?

व्यवसाय हा कोणत्याही गोष्टीचा होऊ शकतो. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी शाळा हे शिकण्याचे माध्यम असेल. परंतु शाळेत विद्येच्या बदल्यात मिळणारे वेतन हे शिक्षकांसाठी व्यवसायरूपी साधन असते. चहाची टपरी ते हॉटेलपर्यंतच्या गोष्टी व्यवसायात मोडतात. तेच काय आजकाल फेसबुक, ट्विटर हे देखील व्यावसायिक साधने झाले आहे. Continue reading “कोणता व्यवसाय करू?”

सरकार आणि आपण

सरकार म्हणजे कोण? हा प्रश्न बहुदा आपल्या देशातील १% देखील नागरिकांना कधी पडला नसेल. हा अज्ञानाचा विषय नाही तर हा लोकशाही व राजकारणाकडे दुर्लक्षण्याचा प्रकार आहे. राजकारणी चुकले यात शंका नाही. पण सामान्य माणूस कधी यावर विचार करत नाही. अथवा त्याला आहे त्या परिस्थिती मार्ग काढणे अधिक योग्य वाटते. Continue reading “सरकार आणि आपण”

योग्य क्षेत्र

जीवनाच्या प्रवासात मागे वळून पाहिले की अनेक टप्पे दिसतात. शालेय जीवन व त्यापुढील ध्येयाचा प्रवास! आयुष्यात काय करायचं आहे हे ठरवावं अस म्हणतात. परंतु माझ्या बाबतीत हे कधी घडलं नाही. Continue reading “योग्य क्षेत्र”

व्यायाम

अनेकदा अनेक कल्पना आपल्या डोक्यात येतात. पण कधी वेळेअभावी तर कधी आळसामुळे ठरवलेली गोष्ट पूर्ण करता येत नाही. खरं तर या विषयावर खूप आधीच बोलणार होतो. पण अशाच एका गोष्टीला वाव देऊ शकत नव्हतो म्हणून थांबलेलो! गेले चार दिवसांपासून व्यायाम सुरु केला आहे. खूप दिवसांनंतर ही इच्छा पूर्ण होते आहे. Continue reading “व्यायाम”

इंधन दर जास्ती कशासाठी?

इंधनदरात भाववाढ होणे याचाच अर्थ महागाई वाढणे. कारण, इंधनाचा थेट परिणाम वाहतुकीवर व पर्यायाने दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीवर होतो. वाहतूक खर्च वाढला तर उत्पादनाच्या निर्मितीचा खर्च वाढतो. जो वस्तूची किंमत वाढून वसूल केला जातो. हा सामान्यांना जितका त्रासदायक आहे तितकाच सरकारी पातळीवर आनंद देणारा आहे. Continue reading “इंधन दर जास्ती कशासाठी?”

सिंहाच्या बछड्यांची गोष्ट

कोणे एके काळी भरत खंडात गुजराच्या सिंहाचे राज्य होते! त्याचे अनेक बछडे होते. प्रत्येक बछड्याचे सिंहावर फार प्रेम. त्याची डरकाळी भरतखंडाला हादरे देत असे. बाकीचे प्राणी विशेषतः वाघ, हत्तीनां त्याचा विशेष राग होता. सुरवातीला सगळं ठीक चाललेलं. पण पुढे जाऊन सिंह मनात आलेल्या गोष्टी सर्वांना अंमलात आणावयास लावी. कधी नोटाबंदी तर कधी प्राणी गणना! Continue reading “सिंहाच्या बछड्यांची गोष्ट”